पुणे : बहुजननामा ऑनलाईन – देशभरातील निर्माते-दिग्दर्शकांनी मतदारांना २०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपला मत न देण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर आता रंगकर्मी देखील एकत्र आले आहेत. देशभरातील जवळपास ६०० रंगकर्मी एकत्र येऊन देशातील विभाजनवादी शक्तींना सत्तेतून घालवा असे आवाहन मतदारांना करणार आहेत.
त्यामध्ये अनेक रंगकर्मीचा समावेश आहे. ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह.महेश एलकुंचवार.जयंत पवार यांच्यासह शफाअत खान. गीतांजली कुलकर्णी. डॉली ठाकूर. मकरंद साठे यांचा यात समावेश आहे. तसेच पुण्यातून सतीश आळेकर.अतुल पेठे. धर्मकीर्ती सुमंत.आशिष मेहता मतदारांना आवाहन करणार आहेत.
देशातील राजकीय व सामाजिक असहिष्णू -विद्वेषी -विभाजनवादी शक्तींना किंवा विचाराना खत-पाणी घालणाऱ्याना सत्तेतून घालवा. भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांच्या विरोधात मतदान करा. दुर्बळांच्या सक्षमीकरणासाठी मतदान करा. स्वातंत्र्यासाठी आणि वैज्ञानिक विचाराच्या रक्षणासाठी मतदान करा. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मतदान करा. धर्मनिरपेक्ष. सर्वसमावेशक भारताच्या स्वप्नपुूर्तीसाठी मतदान करा. स्वप्न पाहण्याच्या स्वातंत्र्यासाठी मतदान करा. विवेकाने मतदान करा. असे आवाहन रंगकर्मींनी एकत्र येऊन केलं आहे.