बहुजननामा ऑनलाइन टीम – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ट्रॅक्टर रॅली काढत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत खूप गोंधळ घातला. शेतकऱ्यांचा एक ग्रुप लाल किल्ल्यावर आला होता. लाल किल्ल्यावर आंदोलन करणाऱ्यांनी त्यांचा धार्मिक झेंडा लावला. आता या प्रकरणावर बिग बॉस 13 (Bigg Boss 13 ) ची स्पर्धक आणि पंजाबी अॅक्ट्रेस हिमांशी खुराना (Himanshi Khurana) हिनं भाष्य केलं आहे. या सगळ्यानंतर तिनं शेतकऱ्यांचं समर्थन केलं आहे.
हिमांशीचं शेतकऱ्यांना समर्थन
आंदोलन करणाऱ्या काही लोकांनीही शेतकऱ्यांच्या या वर्तनाला विरोध केला. परंतु हिमांशी मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या बाजूनं आहे. हिंसक आंदोलन झाल्यानंतरही ती त्यांची बाजू घेताना दिसत आहे.
हिमांशीनं लोकांना आवाहन केलं आहे की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्यांचं समर्थन त्यांनी कायम ठेवावं. हिमांशीनं हे विधान सोशलवर न करता, फोटोग्राफर्स समोर तिनं बोलून दाखवलं आहे. सध्या ती मुंबईत तिच्या बॉयफ्रेंड सोबत वेळ घालवत आहे.
हिमांशी यावेळी बोलताना म्हणाली, आज मुड ठिक नाहीये. तुम्ही शेतकऱ्यांचा सपोर्ट कायम ठेवा. एवढं बोलून ती तिथून निघून गेली. तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती.