बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना वायरसच्या संसर्गामुळे बरे झालेल्यांमध्ये श्वसनाच्या समस्या सर्वात जास्त आहेत. नुकत्याच झालेल्या अभ्यासात, संशोधकांना असे आढळले की, बरे होऊन रुग्णालयातून बाहेर पडलेल्या अनेक कोरोना रूग्णांना श्वसनाच्या समस्येमुळे 14 दिवसांच्या आत रुग्णालयात दाखल करावे लागले. आरोग्य तज्ञ म्हणतात की याचा अर्थ असा आहे की ज्या लोकंना आधीच श्वसनाच्या संबंधित समस्या आहेत, आणि जर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर त्यांनी पुर्णपणे बरे होण्यासाठी अतिरिक्त काळजी घ्यावी. तसेच कोरोना रोखण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे.
उच्च रक्तदाब देखील असण्याची शक्यता असते
अमेरिकेतील माउंट सिनाई हॉस्पिटलच्या इकोन स्कूल ऑफ मेडिसिनचे गिरीश नाडकर्णी आणि अनुराधा लाल यांनी सांगितले की, रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा दाखल झालेल्या बहुतांश रुग्णांना श्वासोच्छवासाचा त्रास होत आहे. या रुग्णांना क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज आणि हाइपरटेंशन (उच्च रक्तदाब) यासह अनेक रोग होण्याची शक्यता जास्त होती.
समस्या हळूहळू षमोर येतात
नाडकर्णी म्हणाले, ‘हा अभ्यास सांगतो की, बर्याच रूग्णांवर रुग्णालयात दाखल होण्याचा मानसिक परिणाम होतो आणि त्यांच्या समस्या हळूहळू प्रकट होतात. यामुळे आम्हाला कोरोना रूग्णांवरील दीर्घकालीन परिणांमाचा अभ्यास करण्यास आणि त्याच्या निष्कर्षांवर आधारित रूग्णांचा अधिक चांगले उपचार करण्यास मदत होईल. ‘
आपत्कालीन सेवा देखील आवश्यक आहेत
रुग्णालयात दाखल झालेल्या 100 रुग्णांवर केलेल्या अभ्यासानुसार संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. ते म्हणाले की या रुग्णांपैकी 56 रुग्णांना तब्बल चार-पाच दिवसांत आपत्कालीन सेवांची आवश्यकता होती आणि जवळपास निम्म्या रुग्णांना श्वसनाच्या समस्येने वेढले होते. संशोधकांनी असे सांगितले की तरी बहुतेक रुग्ण असे होते ज्यांना पूर्वीसारखी काळजी घेण्याची गरज नव्हती. परंतु ही चिंताजनक बाब आहे की एकदा संसर्गमुक्त होऊन ही लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो.