नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला तुमच्या प्रॉव्हिडंट फंडसंबंधी कोणतीही समस्या असेल तर आता काळजी करण्याचे कारण नाही. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांसाठी एक नवी सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत सदस्यांच्या पीएफशी संबंधित प्रत्येक समस्येचे समाधान प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला केले जाईल. ईपीएफओचे सर्व फिल्ड ऑफिस प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला निधी आपल्या जवळ हा कार्यक्रम आयोजित करून सदस्यांच्या तक्रारींचे समाधान करणार आहे. यासाठी तुम्ही संबंधित ईपीएफओ ऑफिसमध्ये जाऊन आपल्या तक्रारीचे समाधान करू शकता.
प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला निधी आपल्या जवळ कार्यक्रम
जर एखाद्या महिन्याच्या 10 तारखेला सुटी असेल तर निधी तुमच्या जवळ हा कार्यक्रम पुढील कार्य दिनी आयोजित केला जाईल. यामुळे ईपीएफओ सदस्यांना आपल्या समस्या मांडता येतील. सर्वांना एकसाथ प्लेटफॉर्मवर आणणे हा यामगील हेतू आहे.
25 तारीखेपर्यंत व्हावे समस्येचे समाधान
जर एखाद्या सदस्याच्या समस्येचे समाधान निधी आपल्या जवळ या कार्यक्रमात ताबडतोब झाले नाही तर सदस्याचा अर्ज ब्रान्च ऑफिसरला मार्क करावा लागेल. ऑफिसर्स इन चार्जला त्याच महिन्याच्या 25 तारखेला सदस्याची अथवा स्टेक होल्डरची तक्रार निकाली काढावी लागेल. जर कोणत्याही कारणामुळे एखाद्या अर्जदाराची समस्या मार्गी लावण्यास वेळ लागत असेल तर त्याच्या समस्येचे समाधान होईपर्यंत अर्जदाराला अॅक्शन टेकन रिपोर्टसह एक अंतरिम जवाब प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला पाठवत रहावा लागेल.
ऑनलाइनसुद्धा करू शकता तक्रार
याशिवाय तुमची तुमची तक्रार ऑनलाइनसुद्धा दाखल करू शकता. यासाठी ईपीएफओने एक वेबसाइट जारी केली आहे. तुम्ही या वेबसाइटवर आपली तक्रार दाखल करू शकता. आपल्या समस्येच्या निवारणासाठी ईपीएफओच्या ऑनलाइन पोर्टल epfigms.gov.in वर जा. येथे तुम्ही तुम्ही तुमच्या पीएफ खात्याशी संबंधित तक्रारी दाखल करू शकता. येथे तक्रार दाखल केल्यानंतर स्टेटस सुद्धा जाणून घेऊ शकता. या सर्व सुविधा तुम्हाला या पोर्टलवर मिळत आहेत.
Visit : bahujannama.com