नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअॅपने नेहमीच विविध बदल करून आपल्या यूजर्सना चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच विविध फिचर व्हॉट्सअॅप घेऊन येत असते. युजर्सचा चांगला अनुभव देणे हा यामागील कंपनीचा हेतू आहे. आता पुन्हा एकदा 5 नवे दमदार फिचर व्हॉट्सअप लवकवरच आणणार आहे.
1 सीक्रेट चॅट
या फिचरमुळे व्हॉट्सअॅपमधील चॅटिंग हिस्ट्री सर्व्हरवर स्टोर होणार नाही. ती ट्रॅकही करता येणार नाही. चॅट सेव्ह करण्यासाठी जर कुणी स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न करत असेल चॅट करणार्या दोघांनाही नोटिफिकेशन द्वारे माहिती मिळेल. टेलिग्राम अॅपमध्ये हे फीचर आधीपासूनच आहे. यामध्ये प्रायव्हसीचा खास विचार करण्यात आला आहे.
2 डार्क मोड
चॅटिंगवेळी फोनच्या ब्लू लाइटमुळे डोळ्यांना त्रास होत होता. यासाठी व्हॉट्सअॅप डार्क मोड फिचर आणत आहे. यामुळे इंटरफेस डार्क होईल आणि डोळ्यांना त्रास होणार नाही, तसेच बॅटरीची बचत होईल. कंपनीने बीटा व्हर्जनसाठी हे फीचर लाँच केले आहे.
3 मॅसेज डिलिटची सुविधा
या नव्या फिचरमुळे युजरने सेट केलेल्या वेळेवर आपोआपच चॅट डिलिट होईल. यासाठी एक दिवस ते एका वर्षापर्यंतचा कालावधी सेट करू शकता. प्रारंभी हे फीचर केवळ ग्रुप चॅटसाठी असू शकते.
4 ग्रुप सदस्यांची संख्या
सध्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कमाल 256 सदस्य असू शकतात. अन्य प्रतिस्पर्धी कंपन्या मेसेजिंग अॅपवर किमान 5 हजार सदस्यांची सुविधा देत असल्याने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप सदस्यांची मर्यादा वाढविणार आहे. लवकरच हे फिचर येईल.
5 पर्सनल स्टोरेज
चॅटिंग हिस्ट्री आणि मीडिया फाइल्स सेव्ह करण्याचे नवीन फिचर व्हॉट्सअॅप देणार आहे. अँड्रॉइड यूजर व्हॉट्सअॅप चॅट गुगल ड्राइव्हवर, तर आयओएस यूजर व्हॉट्सअॅप चॅट आयक्लाउडवर सेव्ह करतात.
Visit : bahujannama.com