नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | मोदी सरकारने (Modi Government) आर्थिक वर्ष 2020-21 साठी प्रॉव्हिडंट फंडावर मिळणार्या व्याजाचा दर 8.5 टक्केच कायम ठेवला आहे. 5 कोटीपेक्षा सुद्धा जास्त ईपीएफओ (EPFO) खातेधारकांच्या खात्यात व्याजाचे पैसे पाठवत आहे. जर तुमच्या खात्यात हे पैसे आले नसतील तर चिंता करू नका. पीएफ व्याज आले किंवा नाही हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता. याची पद्धत जाणून घेवूयात…
1. उमंग अॅपद्वारे ईपीएफ बॅलन्स चेक करा
प्ले स्टोरवरून उमंग अॅप डाऊनलोड करा. या अॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत.
यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हीस निवडा.
आता युएएन नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल.
तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.
2. ईपीएफओ (EPFO) पोर्टलच्या माध्यमातून चेक करा पीएफ बॅलन्स
यासाठी https://passbook.epfindia.gov.
यानंतर डाऊनलोड व्ह्यू पासबुकच्या ऑपशनवर क्लिक करा.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
3. SMS द्वारे
तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा.
सोबतच तो अॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल.
ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल. (EPFO)
Web Title : EPFO | if pf interest has not come in your account yet then you can check like this learn step by step method.
Suicide Case | महिला बँक मॅनेजर आत्महत्या प्रकरण ! IPS आशीष तिवारीसह 3 जणांवर FIR