पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात रिक्षाने प्रवास (rickshaw Travel) करत असताना अनेकवेळा प्रवाशांचे सामान रिक्षात विसरते. काही रिक्षा चालकांकडून प्रवाशांचे सामान पोलीस ठाण्यात (police station) जमा केले जाते. तर काही रिक्षा चालक सामान देण्याच्या बदल्या प्रवाशांकडे पैशांची मागणी करतात. अशाच एका ‘वाढीव’ रिक्षा चालकाला प्रवाशाला पैसे मागणे (Ransom) चांगलेच महागात (Pune Crime) पडले आहे. रिक्षात विसरलेल्या सामानाच्या बदल्यात पैशांची मागणी करणाऱ्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. तसेच अशा पद्धतीने प्रवाशांकडे पैशांची मागणी केली तर रिक्षा चालकांची गय केली जाणार नाही, असा इशारा मुंढवा पोलीस ठाण्याचे (Mundhwa Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी (Senior Police Inspector Brahmanand Naikwadi) यांनी दिला आहे.
याप्रकरणी शेखर सिद्राम भंडारी Shekhar Sidram Bhandari (वय-31 रा. केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आरोपी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करुन आदर्श बाबासाहेब पालकर (वय-23 रा. लोणी काळभोर, पुणे) याला अटक केली आहे.
(Pune Crime) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल सिद्राम भंडारी हे 23 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास केशवनगर ते गाडीतळ रिक्षाने प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांचा मोबाईल रिक्षामध्ये विसरला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मोबाईल रिक्षात विसरल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी वारंवार मोबाईलवर संपर्क साधला. परंतु आरोपीने त्यांचा मोबाईल परत देण्यास टाळाटाळ केली.
आरोपीने मोबाईल परत करण्यासाठी फिर्यादी यांच्याकडे 6 हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच खंडणी दिली नाही तर मोबाईलमधील वैयक्तीक डाटा इतरांना शेअर करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध तक्रार (Pune Crime) दाखल केली.
पोलिस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहाय्यक आयुक्त कल्याणराव विधाते (ACP Kalyanrao Vidhate), मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे (PSI Anil Binwade) यांनी आरोपीचा शोध सुरु केला.
अखेर आरोपीच्या मुसख्या आवळ्यात पोलिसांना यश आले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे (PSI Shivaji Kate) करीत आहेत.
Web Title : Pune Crime | Beware of rickshaw pullers! If you ask for money in exchange for forgotten luggage in a rickshaw, you will have to go to jail; Mundhwa police arrest one in ransom case.