Enforcement Directorate (ED) | दि सेवा विकास बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मोठी कारवाई, अमर मुलचंदानी, विवेक अरहनासह चौघांची 122.35 कोटींची मालमत्ता जप्त
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Enforcement Directorate (ED) | पिंपरीतील दि सेवा विकास बँकेतील (The Seva Vikas Co-operative Bank) गैरव्यवहार प्रकरणात माजी संचालक, माजी उपमहापौर अमर मुलचंदानी (Amar Mulchandani), रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक (Rosary Education Group) विनय आरहाना (Vinay Arhana), सागर सूर्यवंशी (Sagar Suryavanshi), खेमचंद भोजवानी (Khemchand Bhojwani) आणि त्यांच्या कुटुंबियांची 122.35 कोटी रुपयांची मालमत्ता (Asset Seized) अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate (ED) जप्त केली आहे. 429 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात (Money Laundering Case) पुण्यातील 47 स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत.
रोझरी स्कूलचे संचालक विनय आरहाना आणि विवेक आरहाना यांच्या विरुद्ध कॉसमॉस बँकेची (Cosmos Bank) 20 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी (Pune Crime News) आरहाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने समांतर तपास केला होता. ईडीने 28 जानेवारीला आरहाना यांच्या मालमत्तेवर छापे टाकून चौकशी केली. त्यानंतर विनय आरहाना यांना ईडीने 10 मार्च रोजी अटक केली.
ED has attached 47 immovable properties in Pune & movable assets worth ₹122.35 Cr belonging to Amar Mulchandani, Vivek Aranha, Sagar Suryawanshi and others & their family members/entities, in the money laundering investigation in the ₹429 Cr Seva Vikas Coop. Bank fraud case. pic.twitter.com/8nbqLHL9tR
— ED (@dir_ed) May 19, 2023
पिंपरीतील सेवा विकास बँकेचे माजी संचालक अमर मुलचंदानी यांच्या विरुद्ध 28 जानेवारी रोजी कारवाई केली होती. कर्ज प्रकरणात मुलचंदानी तसेच अन्य संचालकांनी 429 कोटी सहा लाख रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणी मुलचंदानी याच्यासह त्याच्या कुटुंबियांच्या निवस्थानी तसेच कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीने याबाबत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करुन जानेवारीत पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले होते. त्यात कोट्यावधी रुपयांचे दागिने, रोकड अशी बेहिशोबी मालमत्ता ईडीच्या हाती लागली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान ईडी कारवाईस विरोध करुन अधिकाऱ्यांना असहाकार्य केल्याप्रकरणी मुलचंदानी याच्या विरुद्ध
सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मुलचंदानी याच्यासह त्याच्या कुटुंबीयांच्या विरुद्ध ईडीने स्वतंत्र गुन्हा
दाखल केला होता. मुलचंदानी याने बेकायदा कर्जमंजूर करुन गैरव्यवहार केला होता. विनय आरहाना, सागर सूर्यवंशी,
खेमचंद भोजवानी यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. मुलचंदानीच्या गैरव्यवहारात आरहाना, सूर्यवंशी आणि भोजवानी
यांचा सहभाग असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
Web Title : Enforcement Directorate (ED) | ed seized amar mulchandani vivek aranha along with 4 assets worth rs 121 crore
Comments are closed.