नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा मोबाइल नंबर पोर्ट करून एक टेलिकॉम कंपनी सोडून दुसरी निवडता, तसेच आता वीज कनेक्शन सुद्धा बदलू (Electricity Amendment Bill) शकता. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सरकार इलेक्ट्रिसिटी (अमेंडमेंट) बिल, 2021 (Electricity Amendment Bill 2021) कॅबिनेटमध्ये मंजूरीसाठी ठेवू शकते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या नवीन सुधारित कायद्यानुसार ग्राहक वीज कनेक्शन त्याप्रमाणे बदलू शकतो ज्याप्रमाणे ते मोबाइल कनेक्शन पोर्ट करतात. सरकारचे म्हणणे आहे की, यामुळे वीज ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल.
13 ऑगस्टपर्यंत पावसाळी अधिवेशन
पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्ट 2021 ला समाप्त होईल. लोकसभेच्या 12 जुलै 2021 रोजी जारी बुलेटिननुसार, सरकाने सध्याच्या संसदेच्या अधिवेशनात जी नवीन 17 विधेयके सादर करण्याचे ठरवले आहे त्यामध्ये वीज (सुधारित) विधेयकाचा सुद्धा समावेश आहे.
बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, वीज कायद्यात प्रस्तावित दुरूस्तीतून वितरण व्यवसायातून लायसन्सिंग
समाप्त होईल आणि यामध्ये प्रतिस्पर्धा येईल. सोबतच या अंतर्गत प्रत्येक आयोगात कायद्याची
पार्श्वभूमी असलेल्या सदस्याची नियुक्ती आवश्यक असेल. याशिवाय यामध्ये वीज अपीलीय
न्यायाधिकरण (एप्टेल) मजबूत करणे आणि नुतनीकरण खरेदी प्रतिबद्धता (आरपीओ) पूर्ण न
केल्यास दंडाची तरतुद सुद्धा असेल.
सूत्रांनुसार सरकारला पावर सेक्टरमध्ये वेगाने सुधार करायच्या आहेत. यासाठी सरकार हे बिल
लवकरात लवकर अंमलात आणत आहे. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी चौथा
दिवस होता. दोन्ही सदनात जोरदार गोंधळ झाला. या गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज 26
जुलैपर्यंत स्थगित करण्यात आले.
Web Title :- electricity amendment bill 2021 innovation electricity amendment bill 2021 will be introduced in the cabinet electricity connection will be able to change like mobile
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Mann Ki Baat Today | ‘प्रत्येक नागरिकाने आज ‘भारत जोडो आंदोलना’चे नेतृत्व करावे’ – PM नरेंद्र मोदी
Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्राविषयी माहिती देणार्या अभिनेत्रीला गुन्हे शाखेचे समन्स
Income Tax | प्राप्तीकर विभागाचा दावा, दैनिक भास्कर ग्रुपने केली 700 कोटी रुपयांच्या टॅक्सची ‘चोरी’