बिहार : बहुजननामा ऑनलाईन – बिहारमधील बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून मंगळवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) उमेदवार म्हणून कन्हैया कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी चौथ्या टप्यात म्हणजेच २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.बेगूसराय येथे कन्हैया कुमार यांच्यासमोर भाजपचे गिरिराज सिंह आणि आरजेडीचे तनवीर हसन हे बेगूसराय मतदार संघातून उभा आहेत .या दिग्गज नेत्यांचे कन्हैया समोर आव्हान असणार आहे.
कन्हैया कुमार यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी जीरोमाइलमध्ये राष्ट्रकवी दिनकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.आईचे आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज भरायला निघाले आहे.आईचे आशीर्वाद घेतानाचे फोटो ट्विटरवर शेअर केलं आहेत. कन्हैया कुमार यांना समर्थन देण्यासाठी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी सुध्दा उपस्थित होते. याशिवाय अभिनेत्री स्वरा भास्कर, जेएनयू विद्यार्थी संघटनेतील कन्हैया यांचे साथीदार शैला राशिद, गुरमेहर हे देखील उपस्थित होते.