नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच भाजप सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दि. १२ एप्रिल रोजी नांदेडला जाहिर सभा घेणार आहेत. त्याबाबतची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टी जहागीरदार कळवले या सभेसाठी गजानन चव्हाण,रवी राठोड,अब्दुल शफी, यांनी नियोजन केले असल्याचे समजले आहे.
मनसेकडून गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुंबई येथील मेळाव्यात राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर कडवी टीका केली होती. सत्ताधारी भाजप सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी आपण महाराष्ट्राभर जाहिर सभा घेणार असल्याचे देखील त्यावेळी जाहिर करण्यात आले होते. लोकसभा निवडणुका न लढविण्याचा निर्णय मनसेने यापुर्वीच घेतला आहे.
भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना पाडा असेही मनसे अध्यक्षांनी सांगितले होते. त्यानुसारच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दि. १२ एप्रिल २०१९रोजी नवा मोंढा नांदेड सायंकाळी ७ वाजता जाहिर सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या जाहिर सभांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांना फायदा होईल तसेच वंचित आघाडीचे डॉ. यशपाल भिंगे यांना देखील फायदा होईल अशी सर्वत्र चर्चा आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या सभेचा नेमका किती फायदा महाआघाडीला व वंचित आघाडीला होईल हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. नांदेड येथे होणार्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्व नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.