जळगाव :बहुजननामा ऑनलाइन– Eknath Khadse | राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचं
धाडसत्र चालू असलेलं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते (Eknath
Khadse) एकनाथ खडसे यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधताना राज्याचे गृहमंत्री दिलीप
वळसे – पाटील (Dilip Walse – Patil) यांना सल्ला दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वळसे पाटील यांना मी अनेकदा गृहमंत्रीपदाचा हिसका, इंगा दाखवा असं सांगत असतो. यांची शेकडो प्रकरणं आहेत. दोन चार लोकांना वर्षापूर्वी आत टाकलं असतं तर ही परिस्थिती आली नसती, असं एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार जळगावच्या (Jalgaon) दौऱ्यावर असून एका आजोजित कार्यक्रमात खडसे बोलत होते.
https://twitter.com/shiva_shivraj/status/1514876156377505794
जे सत्य आहे ते करा, कोणाला छळू नका, द्वेषाचं राजकारण करु नका.
पण ज्यांनी केले आहे त्यांना भोगायला लावा, तर मग ही परिस्थिती निर्माण होणार नाही, असंही खडसे म्हणाले.
त्यासोबतच खडसेंनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) पडलेल्या धाडींवरूनही भाजपवर निशाणा साधला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, काही कारण नसताना अनिल देशमुखांच्या घरावर 100 पेक्षा जास्त धाडी पडतात.
आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मलाही उगाच अडकवण्याचा प्रयत्न झाला.
पण मी जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही घेऊन बुडणार हे लक्षात ठेवा, असा इशाराही खडसेंनी दिला आहे.
Web Title :- Eknath Khadse | maharashtra home minister dilip walse patil ncp sharad pawar in jalgaon eknath khadse on bjp leader
हे देखील वाचा :
Monsoon 2022 Forecast | खुशखबर ! मान्सून यंदा 99 टक्के बरसणार – हवामान विभाग (IMD)