Pune Cyber Crime | मित्राच्या सर्व कुटुंबाला कोरोना झालाय, पैसे पाठव ! अमेरिकेतील भावाच्या फेसबुकवरील फोटो प्रोफाईलला लावून एकाचवेळी पुणे व दिल्लीत सायबर चोरट्यांनी घातला गंडा

Pune Crime | Obscene text on social media against police, FIR against 9 people

पुणे : बहुजननामा ऑनलाइनPune Cyber Crime | माझ्या भारतातील एका मित्राच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना (Coronavirus) झाला आहे. त्यांच्यातील एक जण दगावला आहे. त्यांना पैशांची गरज आहे, मी सांगतो, त्यावर लगेज पैसे पाठव. मी डॉलर बँक खात्यात ट्रान्सफर करतो, असा अमेरिकेतील भावाचा व्हॉटसअ‍ॅप मेसेज (Whatsapp) पाहून एका ज्येष्ठ नागरिकाने त्याप्रमाणे तब्बल २६ लाख रुपये पाठविले. काही दिवसांनी खात्यात पैसे जमा न झाल्याने सायबर चोरट्याने (Pune Cyber Crime) गंडा घातल्याचे या ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आले. अशा प्रकारे दिल्लीमध्येही सायबर चोरट्याने (Delhi Cyber Crime) गंडा घातल्याचे समोर आले आहे (Pune Crime). याप्रकरणी ६८ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद दिली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ज्येष्ठ नागरिक असून ते सुखवस्तू आहेत. त्यांच्या मुलाचा व्यवसाय आहे. त्यांचा भाऊ अमेरिकेत राहतो. त्यांचा तेथे कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे. कोरोना खूप असताना १० ऑक्टोबर २०२१ रोजी सायबर चोरट्याने फिर्यादीच्या भावाचा व्हॉटसअ‍ॅप प्रोफाईल असलेल्या एका क्रमांकावरून मेसेजद्वारे संपर्क साधला. त्यांना संशय येऊ नये म्हणून चोरट्यांनी अगोदरच नेटवर्क प्रॉब्लेम असल्याचे कारण सांगितले. फिर्यादीना भाऊ बोलत असल्याचे वाटल्याने त्यांनी त्यांच्यासोबत संवाद सुरू ठेवला.

 

भारतातील माझ्या एका मित्राच्या कुटुंबीयांना कोरोना झाला असून, त्यांना पैशांची गरज असल्याचे सांगून ५ लाख रुपये नितीन दहिया नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर भरण्यास सांगितले.
फिर्यादीना भाऊ सांगतो आहे असे वाटल्यामुळे त्यांनी त्या खात्यावर पैसे भरले.
त्यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादीना त्यांच्या व्हॉटसअ‍ॅप मेसेजवर त्यांच्या खात्यात डॉलर भरल्याचे स्क्रीनशॉट पाठवले.
त्यामुळे त्यांना आणखीनच खात्री वाटली.
फिर्यादी हे जाळ्यात अडकल्याचे पाहून चोरट्यांनी मित्राच्या कुटुंबातील एक जण दगावला असल्याचे सांगून त्यांना भावनिक केले.
१३ ऑक्टोबरपर्यंत ५ ते ६ वेळा एकूण २६ लाख रुपये विविध कारणे सांगून भरून घेतले.
त्या बदल्यात प्रत्येकवेळी डॉलर पाठविल्याचे स्क्रीनशॉट टाकून दोन दिवसांत पैसे जमा होतील, असे सांगितले.
एके दिवशी फिर्यादीनी बँकेत जाऊन खात्यावर डॉलर जमा झाले की नाही हे पाहिले.
तेव्हा असे कोणतेच पैसे त्यांच्या खात्यावर आले नसल्याचे बँकेतील अधिकार्‍यांनी सांगितले.
दरम्यान, संशय आल्यामुळे त्यांनी आपल्या भावाला फोन करून विचारणा केली.
त्यावेळी त्यांनी आपण पैसे मागितले नसल्याचे व आपल्या कोणत्याच मित्राच्या कुटुंबाला कोरोना झाला नसल्याचे सांगितले.
तसेच अशाच प्रकारे दिल्लीमध्येही एकाला फसविल्याची माहिती त्यांच्या भावाने दिली.
तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई (Senior Police Inspector Swati Desai) अधिक तपास करीत आहेत.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Pune Cyber Crime | Corona to all my friends family send money Cyber thieves set up gangs in Pune and Delhi at the same time by posting a photo profile of their American brother on Facebook

 

हे देखील वाचा :

Whatsapp New Group Voice Call Feature | व्हॉट्सअप ‘ग्रुप व्हॉईस कॉल’मध्ये 32 लोकांना सहभागी होण्याची देणार परवानगी, मोठ्या फाईल्स करता येतील शेअर

Pune Crime | शारीरीक संबंधाचे चित्रण करुन ते पहिल्या पतीला पाठवून केली बदनामी; वानवडी परिसरातील घटना

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात तेजी, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचा भाव