मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – Eknath Khadse |राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज सकाळी पत्रकार परिषद ( Press Council) बोलावली होती. मात्र आता प्रकृती बिघडल्याने एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पत्रकार परिषद ( Press Council) रद्द केली आहे. त्यामुळे सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) चौकशीला ते हजर राहणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भोसरी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी (Land Misappropriation Case) गुरुवारी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना ईडी (ED) ने अटक (Arrest) केली. त्यानंतर ईडीने एकनाथ खडसे यांना समन्स बजावले आहे. त्यांना गुरुवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास बजावले आहे.
भोसरी येथील जमीन व्यवहारात भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा आरोप पुण्यातील व्यावसायिक हेमंत गावडे (Businessman Hemant Gawde) यांनी केला होता. भोसरी येथील जमिनीची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असताना ती केवळ ३.७५ कोटी रुपयांना खडसे कुटुंबियांना विकण्यात आल्याचा आरोप आहे. ही जमीन खरेदी करण्यासाठी चौधरी यांच्या बेंचमार्क बिल्डकॉन कंपनी (Benchmark Buildcon Company) ला पाच कंपन्यांकडून पैसे मिळाले होते. या पाच कंपन्यांना देखील ईडीने अगोदर समन्स बजावले होते. मात्र, त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. मुळात या सर्व कंपन्या बनावट कंपन्या असल्याचे दिसून आले.त्यामुळे या व्यवहारात मनी लाँड्रिंग (Money Laundering) झाल्याचा खडसे कुटुंबियांवर आरोप आहे. त्यातून जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांना न्यायालयाने १२ जुलैपर्यंत कोठडी मंजूर केली आहे.
आता ईडीला सिडी लावू म्हणणार्या एकनाथ खडसे यांनाच ईडीने समन्स बजावले आहे.
त्यामुळे आता एकनाथ खडसे हे चौकशीला हजर राहतात का आणि ईडी पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Title : Khadse’s press conference canceled due to ill health
Virbhadra Singh | हिमाचाल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन
Pune Crime News | माहीती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला 9 दिवसांची पोलिस कोठडी
Modi Cabinet Expansion | केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा, आता हेल्थ मिनीस्टर कोण?