दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – Baramati NCP MP Supriya Sule | दाैंड तालुक्यातील (Daund Taluka) अन्न प्रक्रियेशी संबंधित कृषी प्रक्रिया उद्योग आणि कोल्ड स्टोरेज उद्योगांना भेट देण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस (Pashupati Kumar Paras) यांना खासदार सुप्रिया सुळे (Baramati NCP MP Supriya Sule) यांनी आमंत्रित केले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
खासदार सुळे यांनी आज त्यांची भेट घेऊन निमंत्रीत केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha constituency) दौंड तालुक्यात (Daund Taluka) असलेल्या आर्या ग्रिनफिल्ड, टेस्टी बाईट्स, तन्वी कोल्ड स्टोअरेज व वेअरहाऊस आणि वसंत कोल्ड स्टोरेज या उद्योगांनी गुणवत्ता, उत्पादन, आणि पायाभूत सुविधा उभारणीत आपला ठसा उमटवला आहे. या उद्योगांना भेट देऊन पाहणी करावी, असे सुळे (Baramati NCP MP Supriya Sule) यांनी यावेळी त्यांना सांगितले.
पारस यांनी यावेळी त्यांचे निमंत्रण स्वीकारत सकारात्मक प्रतिसाद दिला. यासाठी खासदार सुळे यांनी त्यांचे आभार मानले.
Web Title : Eat to visit agro processing industries in Daund Taluk. Sule’s invitation to Union Ministers
हे देखील वाचा :