Bhaskar Jadhav | आता सभागृहात येण्याची इच्छा नाही, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन भास्कर जाधव परतले; नेमकं काय घडलं?

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सध्या मुंबईमध्ये विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरु आहे. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा असून सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप ठाकरे गटाची (Thackeray Group) तोफ म्हणून ओळखळल्या जाणाऱ्या भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला आहे. विधानसभेतून बाहेर आल्यानंतर भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे विधिमंडळाच्या (Assembly) पायऱ्यांवर नतमस्तक झाले आणि आता या सभागृहात येण्याची इच्छा नसल्याचे म्हणत ते तेथून निघून गेले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले, आज मी सभागृहातून बाहेर पडलो. उद्या गुढीपाडवा (Gudhipadva 2023) आहे. त्यानंतर तीन दिवस सभागृह आहे. मी गावी निघालोय आणि पुन्हा येणार नाही. कारण येण्याकरिता इच्छा राहिली नाही. भास्कर जाधव एकही दिवस सभागृह चुकवत नाही. मात्र यंदा मला जाणीवपूर्वक सभागृहात बोलू दिले जात नाही. मला विषय मांडू दिले जात नाही. नियमाने बोलण्याचा, सभागृह कायद्यानुसार चालवण्यासाठी मी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले.
जाधव पुढे म्हणाले, अधिवेशन, कामकाज नियम कायदा परंपरा, घटनेनुसार चालावे असं मला वटतं. माझ्या दोन लक्षवेधी लागाव्यात यासाठी प्रयत्न करुनही एकही लक्षवेधी लागली नाही. त्यामुळे मनात वेदना होत आहेत. मला सभागृहात बोलायला दिले असते तर महत्त्वाचा मुद्दा मांडणार होतो. कोकणातील रस्ते चांगले करण्यासाठी अभ्यास गट नेमा, अधिकाऱ्यांचे काळे धंदे उघड होतील हे मला सांगायचे होते. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थाबवाव्यात हे विषय मला सभागृहात मांडायचे होते पण मला बोलू दिले नाही असं भास्कर जाधव म्हणाले.
https://www.facebook.com/photo?fbid=787014076120067&set=pcb.787014156120059
भास्कर जाधव यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या मनातील नाराजी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत उपस्थित
राहून कोकणासह राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडून ते सोडविण्याचा माझा प्रयत्न असतो.
विधानसभा हे संसदीय लोकशाहीचं असं एक सभागृह आहे जिथे अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देता येतो व
त्यासाठी माझा कायम संघर्ष असतो, हेदेखील आपण सर्वजण जाणता.
उठावदार कामगिरी करून समाधानाने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांना नमस्कार
करूनच मी बाहेर पडतो, ही माझी कित्येक वर्षांपासूनची प्रथा आहे.
या अधिवेशनात मात्र माझी हक्काची संधीसुद्धा वारंवार डावलण्यात आली.
त्यामुळे अधिवेशन संपायला तीन दिवस असतानाही आज अत्यंत विषण्ण मनाने विधानभवनातून बाहेर पडावं लागलं.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Bhaskar Jadhav | they are not allowed to speak in the assembly thackeray group mla bhaskar jadhav alleged
हे देखील वाचा :
Comments are closed.