नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रॉबर्ट्सगंज भागातील पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीवर छळ करणाऱ्या आणि तिला लैंगिक व्यापार व्यवसायात ढकलल्याबद्दल तीन महिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर आणि तपास करणाऱ्या चाईल्ड हेल्पलाईन रिपोर्टच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोतवाली प्रभारी मिथिलेश मिश्रा यांनी सांगितले की, जवळपास महिनाभरापूर्वी शेजारच्या मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलीने आई-वडिलांनी रागवल्यामुळे घरातून पळ काढला आणि रॉबर्ट्सगंज गेली होती. त्या स्टेशनवर तिला तीन महिला भेटल्या. तिला फसवून त्या चोपण पोलिस स्टेशन परिसरातील खेडे गावात घेऊन गेल्या. तिथे तिला एका दुसर्या महिलेच्या ताब्यात दिले. ती महिला तिला घर काम करायला लावत होती. तिला कुठेही जाऊ देत नव्हती.
श्री. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, मुलीने सांगितले की, तिन्ही महिला दोन- तीन दिवसासाठी तिला राबर्ट्सगंज येथे एखाद्या घरी किंवा हॉटेलमध्ये घेऊन जात होत्या. तिथे तिला नशीला पदार्थ खाऊ घालून वेश्याव्यवसायात करायला लावत असे. तिने अनेकदा महिलांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. २४ सप्टेंबर रोजी तिन्ही महिला तिला रॉबर्टगंजमधील हॉटेलमध्ये घेऊन गेल्या. तेथून ती रॉबर्ट्सगंज रेल्वे स्थानकात कशी तरी पोहचली. तेथील एखाद्याच्या मदतीने तिने १०० वर कॉल केला. पोलिस घटनास्थळी पोहचले आणि प्रकरण समजून घेतल्यानंतर चाइल्ड हेल्प लाईनवर कॉल केला.
हेल्पलाइनने तिला बरोबर घेतले आणि बाल सुधारगृहात ठेवले. दरम्यान, या तिघीनांही हॉटेलमधून अटक करण्यात आली. त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाची चाईल्ड हेल्प लाईन टीमने चौकशी केली. तपासात प्रकरण योग्य असल्याचे समजल्यानंतर बुधवारी पीडित मुलीची तहरीर व हेल्पलाईनच्या तपासणी अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. यासह तिन्ही महिलांनाही अटक केली.
Visit : bahujannama.com