नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि कर्मचाऱ्यांनी नुकताच मोठा निर्णय घेतला आहे, आपल्या कंपनीच्या भविष्यासाठी त्यांच्यात महत्वपूर्ण चर्चा झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार झुकरबर्ग यांना टिकटॉक संदर्भात चिंता भेडसावत आहे. त्यात भारतात टिकटॉकला मिळत असलेली प्रसिद्धी हाही चर्चेचा विषय होता, त्यामुळे टिकटॉकला टक्कर देण्यासाठी फेसबुकने काही इंट्रेस्टटिंग गोष्टी आणण्याचा निर्णय घेतला आहे.
टिकटॉक चीनच्या एका दिग्गज टेक कंपनीने बनवलेलं पहिलं असं कन्झ्युमर प्रोडक्ट आहे, जे जगभरात चांगलं फॉर्मात आहे. त्यासाठी ते खूप मेहनत घेत आहेत. तसेच भारतात टिकटॉक वेगाने वाढत आहे. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट असल्याचे फेसबुकचे सीईओ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यामुळे भारतीय तरुण-तरुणींमध्ये टिकटॉक विषयी असलेली क्रेझ पाहता फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना चिंता वाटत आहे. टिकटॉकने हळूहळू इन्स्टाग्रामला मागे टाकले आहे. परंतु टिकटॉक इन्स्टाग्रामच्या केवळ एका फिचर ‘एक्सप्लोर’ टॅब प्रमाणे असल्याचे झुगरबर्ग यांनी संगितले.
दरम्यान फ़ेसबुक टिकटॉकला टक्कर देण्याची योजना आखत आहेत. ज्या देशांमध्ये टिकटॉक प्रसिद्ध आहे, तेथे फेसबुक टिकटॉकशी सामना करणार आहे. अर्थात या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. फेसबुकच्या सीईओने कर्मचाऱ्यांना सांगितलं की, आमच्याकडे Lasso नावाचं प्रोडक्ट आहे. हे एक स्टँडअलोन अॅप आहे, ज्यावर आम्ही काम करत आहोत. याची सुरुवात मॅक्सिकोहून होईल. झुकरबर्ग यांच्या म्हणण्यानुसार, भारताप्रमाणे टिकटॉक यूएसमध्येदेखील तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
Visit : bahujannama.com