धुळे : बहुजननामा ऑनलाईन – रविवारी सायंकाळी एका व्यक्तीने त्याच्या सोबतच्या महिलेसह नरडाणा टोलनाक्याजवळ दारु पिऊन धिंगाणा घातला होता. त्यांची विचारपूस करणाऱ्या पोलिसांचीच त्याने कॉलर पकडून शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.
काय आहे प्रकरण
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील जुने टोलनाक्यापासून जवळच असणाऱ्या शीतल हॉटेलसमोर अलका किशोर पाटील आणि महादेव पेट्रोल पंपाचा मॅनेजर भूषण ज्ञानेश्वर पाटील हे रविवारी सायंकाळी या दोघांनी गोंधळ घातला होता. त्यानंतर उपनिरीक्षक शरद पाटील आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवून त्यांची विचारपूस केली. तेव्हा त्या महिलेसह पुरुषाने शिवीगाळ केली आणि ते रस्त्यावर धावले. त्यांना पोलिसांनी अडवले असता त्यांनी थेट पोलसांची कॉलर पकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.