पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Dr. Suresh Jadhav | सिरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव (Dr. Suresh Jadhav) यांचं निधन (Died) झालं आहे. ते 71 वर्षाचे होते. सुरेश जाधव यांनी आज (बुधवारी) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 1 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. जाधव यांच्या जाण्यामूळे भारतीय वैद्यकिय क्षेत्राची अपरिमित हानी झाली असल्याची भावना औषध निर्माण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
डॉ. सुरेश जाधव (Dr. Suresh Jadhav) यांचे कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लशीच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान आहे. डॉ. जाधव हे बुलढाण्यासारख्या छोट्या गावातून पुण्यात आले. त्यांनी भारतातील लस संशोधनात जागतिकस्तरावर कामातून स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. त्यामुळे त्यांना भारतीय लस संशोधनातील भिष्माचार्य म्हटले जात. त्यांच्या नावे जगातील अनेक पेटंटची नोंद आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, सन 1979 पासून सिरम इन्स्टिट्यूट येथे रुजू झाले. ते सिरम इन्स्टिट्यूटचे 1992 पासून कार्यकारी संचालक म्हणून काम पाहू लागले. तसेच, डॉ. जाधव यांनी नागपूर विद्यापीठातून फार्मसीमध्ये ‘पीएच. डी.’ घेऊन 1970 पासून 50 वर्षांची अखंड सेवा दिली. त्यांचा कार्यकाल मार्च 2022 पर्यंत असला तरी आरोग्यविषयक कारणामुळे त्यांनी ऑक्टोबरमध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.
Web Title :- Dr. Suresh Jadhav | Serum’s Executive Director Dr. Suresh Jadhav passes away.
PM Kisan | ‘या’ शेतकर्यांना मिळणार नाहीत 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये, जाणून घ्या सरकारचे नवीन नियम