मुंबई बहुजननामा ऑनलाईन – डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीनही डॉक्टरांविरोधात मुंबई गुन्हे शाखेने २ हजार पानांचे आरोपपत्र विशेष सत्र न्यायालयात दाखल केले आहे. या तीनही डॉक्टरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी २५ जूलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
टोपीवाला महाविद्यालयात पदव्युत्तर वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी वरिष्ठ असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन डॉक्टरांविरोधात अँट्रॉसिटी आणि रॅगिंगविरोधी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुख्यमंत्र्यांनी मुंबई गुन्हे शाखेकडे दिला होती. मुंबई गुन्हे शाखेकडून कारागृहातच काही तासांसाठी चौकशी करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला.
तर अटकेत असलेल्या तिघी डॉक्टरांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला होता. तिघींनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी २५ जूलै पर्यंत तहकुब करण्यात आली आहे.