मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर नीलम शर्मा यांचं शनिवारी निधन झालं आहे. दूरदर्शनने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. असे सांगितले जात आहे की, त्या कॅन्सरने ग्रस्त होत्या. संध्याकाळी 6 वाजता निगम बोध घाटावर त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले आहेत.
नीलम शर्मा दूरदर्शनमधील एक प्रसिद्ध चेहरा होता. 1995 साली त्यांनी दूरदर्शनने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आपल्या 20 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी तेजस्विनी आणि बडी चर्चा यांसारख्या कार्यक्रमांचे संचालन केले आहे. नीलम शर्मा तेजस्विनी कार्यक्रमात समाजासाठी रोल मॉडेल बनलेल्या भारताच्या दुर्गम भागात रहात असलेल्या महिलांनी केलेल्या कामगिरीवर चर्चा करत होत्या.
#DDNews की वरिष्ठ एंकर @NeelumSharma का असामयिक निधन, 'नारी शक्ति' सम्मान सहित कई पुरस्कारों से सम्मानित नीलम शर्मा ने अपने 20 वर्षों से भी अधिक के सेवाकाल में 'तेजस्विनी' से लेकर 'बड़ी चर्चा' आदि कई लोकप्रिय कार्यक्रमों का संचालन किया.
दूरदर्शन परिवार की ओर से विनम्र श्रद्धांजलि pic.twitter.com/jUp9PgDk2b— डीडी न्यूज़ (@DDNewsHindi) August 17, 2019
नीलम शर्मा अनेक मीडिया संस्थांसाठी व्हिजीटींग फॅकल्टी होत्या. नीलम शर्मा यांनी आपल्या करिअरमध्ये बेस्ट न्यूज अँकर, आधी आबादी अवॉर्ड आणि केपीएस गिल फियरलेस जर्नलिस्ट अवॉर्ड यांसारखे अनेक प्रतिष्ठीत अवॉर्ड मिळवले आहेत. याच वर्षी 8 मार्च रोजी महिला दिनाच्या दिवशी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती सन्मानाने गौरवण्यात आले होते. नारी शक्ती पुरस्कार महिलांचे कतृत्व आणि योगदानाला मान्यता देणारा भारताचा सर्वोच्च नागरीक पुरस्कार आहे. नीलम शर्मा यांच्या निधनानंतर त्यांचे चाहते सोशल मीडियावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली देताना दिसत आहेत.