नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मेन्स इनरवेयरसोबत अर्थव्यवस्थेला घेऊन (Global Economy Growth) मिळणाऱ्या संकेतांची चर्चा जगातील वृत्तपत्रामध्ये होताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार मोठ्या कंपन्यांचा तीन महिन्यातील सेल्स खूपच कमी आहे. सेल्स घटल्याने उत्पन्न कमी झालं आहे. याचा परिणाम नफ्यावरही झाला आहे. अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्वचे माजी चेअरमन एलन ग्रीनस्पैन यांनी इनरवेयर्सच्या सेल्सला घेऊन इंडेक्स तयार केली आहे. याला मेन्स अंडरवेयर इंडेक्स म्हटलं जातं. यात पुरुषांच्या अंडरवेयर विक्रीत आलेल्या घटीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
जियोजित फायनांशियलचे सीनियर प्रेसिडेंट गौरांग शाह यांचं म्हणणं आहे की, मेन्स अंडरवियर इंडेक्सही अर्थव्यवस्थेतील सुस्तीचे संकेत देत आहे. हा विक्रीवर दबाव दाखवत आहे. मेन्स अंडवेयर इंडेक्सची सुरुवात 1970 च्या दशकात झाली होती. युएस फेडरल रिझर्वचे चेअरमन राहिलेले ग्रीनस्पैन यांनी या इंडेक्सची सुरुवात केली होती. या इंडेक्समधून सन 1990, 2001 आणि 2007 मध्ये अमेरिकी मंदीच्या आधी बरोबर असेच संकेत मिळाले होते.
डेटींग इंडिकेटरचीही खूप चर्चा
अमेरिकेतील ऑनलाईन डेटींग सर्व्हिस Match.comने डेटींग आणि मंदीच्या दरम्यान एका पॅटर्नबद्दल सांगितले आहे. कंपनी जेव्हा अडचणतीत असते तेव्हा कर्मचाऱ्यांमधील डेटींग वाढते. याआधी 2008 च्या चौथ्या तिमाही मध्ये डेटींग साईटची व्यस्तता 7 वर्षात सर्वाधिक होती.
अमेरिकेतही मंदीचे संकेत
गौरांग शाह म्हणतात की, “अमेरिकेतील बॉन्ड यील्डकडून मंदीचे संकेत मिळत आहेत. Inverted Yield curve म्हणजे उलच्या यील्ड कर्वची स्थिती बनली आहे.