बहुजननामा ऑनलाइन – एकीकडे जगभरात वुमन इक्विलिटी डे साजरा करत आहे आणि दुसरीकडे सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात महिलांसोबत होणाऱ्या घरगुती हिंसेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. महिलांना समाजात समान दर्जा देण्याच्या हेतूने दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी वुमन इक्विलिटी डे सेलिब्रेट केला जातो.
घरगुती हिंसेवर प्रकाश टाकणारा हा व्हिडीओ जेनान माऊसाने शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “घरगुती हिंसेबद्दल लोकांना जागरुक करणारा शानदार व्हिडीओ.”
https://twitter.com/jenanmoussa/status/1165193517951569921
एका मिनिटाच्या व्हिडीओत महिलेने रिलेशनशिपमध्ये आल्यानंतरचा प्रवास खूप सुंदर पद्धतीने दाखवला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर डोळेही पानावतात. एखाद्यावर विश्वास ठेवून महिला जेव्हा नात्यात येते तेव्हा तिच्यासोबत काय होतं हे उत्तमरित्या दाखवलं आहे.
काय आहे व्हिडीओत ?
व्हिडीओत दिसत आहे की, महिला सुरुवातीला खूप खुश आहे. तिला फूल आणि अंगठी सारख्या सुंदर भेटी मिळत आहेत. यानंतर या आनंदी महिलेचं आयुष्य एकदम बदलून जातं. प्रत्येक त्रास सहन करूनही ती नेहमी हसते. एका पाईंटवर जाऊन तिच्या चेहऱ्यावर इजा झाल्याचंही दिसत आहे. ती या व्रणांना मेकअपने झाकण्याचाही प्रयत्न करते. भारतात आजही काही घरांमध्ये घरगुती हिंसा होताना दिसते.