पुणे : बहुजननामा ऑनलाईन – जेजुरी येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार झाले. मात्र, त्यापूर्वीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी पहाटे पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. पडळकरांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पडळकर यांच्यावर टीकास्त्र सोडले.
गोपीचंद पडळकर …तजुर्बे ने शेरों को खामोश रहना सिखाया; क्योंकि दहाड़ कर शिकार नहीं किया जाता; कुत्ते भोंकते हैं अपने जिंदा होने का एहसास दिलाने के लिए; मगऱ जंगल का सन्नाटा शेर की मौजूदगी बंयाँ करता है।
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 12, 2021
गृहनिमार्ण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला आहे. आव्हाड यांनी शायरीतून पडळकरांना कुत्ते भोकते है… असे म्हटले आहे.
तज़ुर्बे ने शेरो को खामोश रहना सिखाया,
क्योंकि दहाड कर शिकार नहीं किया जाता,
कुत्ते भोकतें है अपने जिंदा होने का एहसास दिलाने के लिए,
मगर जंगल का सन्नाटा शेर की मौजूदगी बयाँ करता है, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना कुत्र्याची उपमा दिली आहे.
काय म्हणाले होते पडळकर ?
अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवारांसारख्या भ्रष्ट नेत्याने करावे हा अहिल्यादेवींचा अपमान आहे, असे विधान पडळकर यांनी केले. त्यानंतर गोपीचंद पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी जेजुरी गडावर गोंधळ घातला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेपानंतर हा वाद तात्काळ मिटला.