बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना लसीकरणाची(Corona Vaccine) तयारी सुरु आहे. शनिवारी दशभरातील सर्व राज्यांत कोरोना लसीकरणाचं ड्राय रन (Corona Vaccine Dry Run) करण्यात आले. लवकरच कोरोना लस प्रत्यक्षात दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड-19 लसीच्या वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी, डेटा ठेवण्यासाठी आणि लोकांना या लसीसाठी नोंदणी करण्यासाठी कोविन (Co-WIN App) नावाचे अॅप तयार केले आहे. देशातील नागरिक जे आरोग्य कर्मचारी नाहीत ते कोविन अॅपवर लससाठी स्वत: ची नोंदणी करु शकतात. ज्यासाठी त्याना हे अॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअर वरुन डाऊनलोड करावे लागेल. यामुळे लसीकरण सुरु झाल्यानंतर ज्यांनी या अॅपवर आधीच नोंदणी केली आहे त्यांना लवकरात लवकर लस मिळेल.
CoWINअॅप काय आहे ?
Co-WIN (COVID-19 Vaccine Intelligence Network) हे eVIN (Electronic Vaccine Intelligence Network) चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. ते प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, सरकारला तीन टप्प्यात ही लस मिळणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील सर्व फ्रंटलाईन हेल्थकेअर प्रोफेशनल्स आणि दुसऱ्या टप्प्यात आपत्कालीन सेवांशी संबंधित लोकांना लसीचा डोस मिळेल. देशातील राज्य सरकारांकडून अशा लोकांचा डेटा गोळा करण्यात येत आहे. यानंतर तिसऱ्या टप्प्यात, ज्या लोकांना गंभीर आजारांनी ग्रासले आहे, त्यांना लस दिली जाणार आहे. यासाठी Co-WIN अॅपद्वारे स्वत: नोंदणी करणे (सेल्फ रजिस्ट्रेशन प्रोसेस) आवश्यक असेल.
Co-WIN अॅपला पाच मॉड्यूलमध्ये विभागले आहे
कोव्हिड-19 लसची सहज ट्रॅकिंग व नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी Co-WIN अॅपला पाच मॉड्यूलमध्ये विभागले आहे. ज्यामध्ये पहिले प्रशासकीय मॉड्यूल, दुसरे रजिस्ट्रेशन मॉड्यूल, तिसरे लसीकरण मॉड्यूल, चौथे लाभार्थी स्वीकृती मॉड्यूल आणि पाचवे रिपोर्ट मॉड्यूलमध्ये विभागले आहे. ज्यांना लस द्यायची आहे त्यांना नोंदणी मॉड्यूलअंतर्गत माहिती द्यावी लागेल. लसीकरण मॉड्यूलमध्ये त्यांची माहिती तपासली जाईल आणि लार्भार्थी स्वीकृती मॉड्यूल त्यांना त्यांच्या लसीबाबत प्रमाणपत्र पाठवेल.
कशी करावी नोंदणी ?
– जे नागरिक आरोग्य कर्मचारी नाहीत त्यांना CoWIN अॅपवर नोंदणी मॉड्यूलद्वारे लसीसाठी नोंदणी करता येणार आहे. CoWIN अॅप गूगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअर वरून डाऊनलोड करता येईल. दरम्यान, आपल्या माहितीसाठी हे अॅप्लिकेशन अद्याप लाँच झालेले नाही.
– CoWIN वेबसाईटवर स्वत: नोदणीसाठी 12 फोटो आयडेंटिटी डॉक्यूमेंट्स ( Voter ID, Aadhar Card, Driving License, Passport, pension Document) यापैकी कोणतेही एक आवश्यक असेल.
– ऑनलाईन नोंदणीनंतर लाभार्थीला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस मिळेल. त्यानुसार लसीची तारीख, वेळ व ठिकाण दिले जाईल.