नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात FASTag लॉन्च होताच भामट्यांनी लोकांना फसवण्याची नवी पद्धत शोधून काढली आहे. लोकांची नोंद करण्यासाठी आणि त्यांचे फास्टटॅग व्यवस्थित काम करत आहे का हे तपासण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने हे भामटे युपीआयच्या माध्यमातून बँक खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी फसवणुकीची पहिली घटना अधिकृतरित्या नुकतीच समोर आली, जेव्हा बेंगळुरूच्या एका व्यक्तीला फसवणुक करणार्यांनी 50,000 रुपयांना चूना लावला. या व्यक्तीने आपल्या फास्टटॅगबाबत तक्रार केली होती, ज्यानंतर त्याला अॅक्सिस बँकेतून एका कथित ग्राहक सेवा अधिकार्याचा खोटा कॉल आला, ज्याने त्यास सांगितले की, फास्टॅग वॉलेट वापरण्यासाठी एक ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल.
या भामट्यांनी ऑनलाइन नोंदणीच्या बहाण्याने ग्राहकाला मूर्ख बनवून त्याचा युपीआय पिन घेतला. पीडित व्यक्तीने सांगितल्यानुसार कॉल करणार्याने त्याला एसएमएसच्या माध्यमातून एक लिंक पाठवली, ज्यामध्ये अॅक्सिस बँक – फास्टॅग फॉर्म लिहिले होते. या फॉर्ममध्ये नाव, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआई) पिन सारखी माहिती मागितली होती. यानंतर त्याच्याकडे मोबाईलवर आलेला वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) मागितला गेला जो त्याने दिला.
यासाठी वाचकांना सल्ला आहे की, कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कामासाठी कोणताही पिन किंवा पासवर्ड शेयर करू नका. फास्टॅगच्या नोंदणीसाठी तुमच्याकडे कोणीही पासवर्ड अथवा ऑनलाइन बँकिंगची माहिती मागत नाही. कुणी मागितल्यास ती देऊ नका. फास्टॅग नवीन व्यवस्था असल्याने फसवणूक करणारे लोकांना लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. केवळ दोनच पद्धतीने तुम्ही आपला फास्टॅग सक्रिय करू शकता. माय फास्टॅग अॅप आणि जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही हे काम करू शकता. फोनवर बँक कर्मचार्यासोबत बोलून फास्टॅगची नोंदणी होत नाही. याबाबत तुम्हाला कोणताही कॉल आल्यास ताबडतोब तो डिस्कनेक्ट करा. काही समस्या असेल तर बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करा.
Visit : bahujannama.com