निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये ‘अंतर्गत’ वादाला सुरुवात, शाजिया इल्मीनं केला ‘हा’ खळबळजनक आरोप

sajiya-ilmi
December 25, 2019

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीआधीच भाजपामध्ये अंतर्गत कलहाला सुरुवात झाली आहे. आम आदमी पार्टी सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या शाजिया इल्मीने त्यांच्यासोबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला आहे. शाजिया इल्मीने स्पष्टपणे पार्टीतील नेत्यांना सांगितले कि अनेक दिवसांपासुन होत असलेला पक्षपात आता जास्त दिवस सहन करणार नाही.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जेव्हा याची माहिती समजली तेव्हा त्यांनी शाजिया यांच्या प्रति सहानुभूती दाखवत झालेल्या प्रकरणाची चौकशी करू असे आश्वासन या नेत्यांकडून देण्यात आले. पंतप्रधान मंचावर असताना शाजिया यांना मंचावर जाऊ न देण्याचा प्रयत्न पक्षातील काही नेत्यांनी केला. त्यांनी सांगितले कि मला वगळून भाजपाच्या इतर पदाधिकाऱ्यांचे पास बनवले पण माझा एसपीजी क्लेअरन्स वाला पास बनवला नाही.असा आरोप शाजिया यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर केला आहे.

आगामी विधानसभेत पक्ष सोडून जाणाऱ्या अनेक नेत्यांचा आता कस लागणार आहे त्याला शाजियासुद्धा अपवाद नाहीत. त्यामुळे आता शाजिया आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी काय काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Visit : bahujannama.com