बहुजननामा ऑनलाईन- कोरोनामुळे मागील काही दिवसांपुर्वी उपचार घेत असलेले बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांच्या भावाचा मृत्यू झाला आहे. अस्लम खान असे त्यांचे नाव असून वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अस्लम खान यांनी करोनाची लागण झाली होती. त्यांमुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
Aslam Khan, younger brother of veteran actor Dilip Kumar passed away early morning today. He had diabetes, hypertension and ischaemic heart disease and had tested positive for #COVID19: Lilavati Hospital, Mumbai #Maharashtra
— ANI (@ANI) August 21, 2020
अभिनेते दिलीप कुमार यांच्या एहसान खान (90 वर्ष) आणि अस्लम खान(88 वर्ष) या दोन्ही भावांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान, अस्लम खान यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयसंबंधीत काही समस्यादेखील होत्या. दरम्यान, दिलीप कुमार यांचे दुसरे बंधू एहसान खानदेखील पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांचीही प्रकृतीदेखील चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.