नवी दिल्ली : Diabetes | मधुमेह आजार आता सामान्य झाला आहे. या आजारापासून वाचण्यासाठी त्याचे संकेत ओळखणे आवश्यक आहे. याची लक्षणे सामान्य ते गंभीर असू शकतात. टाईप-1 डायबिटीजमध्ये लक्षणे ताबडतोब दिसू लागतात. तर टाईप-2 डायबिटीजची (Diabetes) लक्षणे खुप उशीरा दिसून येतात. टाईप-2 च्या तुलनेत टाईप-1 डायबिटीज जास्त गंभीर मानला जातो. या आजाराची काही लक्षणे जाणून घेवूयात.
1. हाता-पयांना सूज, अस्पष्ट दिसणे –
शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढल्याने अनेकदा हातापयांना सूज येते. डोळ्यात सूज येऊन अस्पष्ट दिसू लागते. अशावेळी डॉक्टरांकडे जा.
2. भूक आणि थकवा –
डायबिटीजच्या (Diabetes) रूग्णांना खुप लवकर भूक थकवा येतो. अशी लक्षणे दिसल्यास ताबतोब तपासणी करून घ्या.
3. वारंवार लघवी आणि तहान लागणे –
ब्लड शुगर वाढल्याने किडनी योग्यप्रकारे काम करत नाही आणि रूग्णाला वारंवार लघवीला जावे लागते. यामुळे सतत तहान लागते.
4. तोंड कोरडे पडणे आणि खाज सुटणे –
डायबिटीजच्या (Diabetes) रूग्णाचे तोंड लवकर कोरडे पडते आणि त्वचेला खाज सुटते वारंवार लघवी केल्याने शरीरात द्रव पदार्थाची कमतरता होते यामुळे तोंड सुकते, त्वचेला खाज सुटते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
5. इन्फेक्शन होणे –
डायबिटीजच्या काही रूग्णांमध्ये स्किन इन्फेक्शन सुद्धा होते. जखम भरण्यास सुद्धा उशीर लागतो. कधी-कधी पायांमध्ये वेदना होतात.
6. वजन कमी होणे –
डायबिटीजच्या रूग्णांना खाण्यातून उर्जा मिळत नाही, ज्यामुळे त्यांचे वजन वेगाने कमी होऊ लागते.
web title : Diabetes early warning signs and symptoms of disease.