धुळे : बहुजननामा ऑनलाईन – Dhule Crime | धुळ्यामध्ये पती- पत्नीच्या नात्याला हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपी पतीने पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात हि घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून किरकोळ कारणामुळे या आरोपी पतीने पत्नीची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःदेखील विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या आरोपी पतीवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृतीदेखील चिंताजनक आहे. (Dhule Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे नेमके प्रकरण?
किरणबाई मोरे वय 40 असे मृत पत्नीचे नाव आहे. त्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर आपल्या पतीपासून होणाऱ्या त्रासाची तक्रार दाखल करण्यासाठी साक्री पोलीस स्टेशन येथे गेल्या होत्या, मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल साक्री पोलिसांनी घेतली नसल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. जर पोलिसांनी वेळेवर संबंधित महिलेच्या तक्रारीची दखल घेतली असती, तर आज ही वेळ मृत महिलेवर ओढवली नसती. तसेच तिच्या मृत्यूला साक्री पोलीस जबाबदार असल्याचा देखील आरोप नातेवाईकांनी केला आहे. (Dhule Crime)
जालन्यामध्ये शिक्षिकेची पाण्यात उडी घेऊन आत्महत्या
जालना जिल्ह्यातील मोती तलावाच्या चौपाटीवरून पाण्यात उडी घेत एका 45 वर्षीय महिला शिक्षिकेने
आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
जयश्री गणेश पोलास असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षिकेचे नाव असून त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
त्यांचे पती गणेश पोलास हे नायब तहसीलदार आहेत.
जयश्री यांनी अचानक एवढे मोठे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. चंदनझिरा पोलिस
या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Dhule Crime | husband takes wife life later ended his life in dhule
हे देखील वाचा :