पनवेल : बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसांपासून चर्चेत असलेला धनगर आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न घेऊन धनगर बांधवांनी आरक्षण मागणीसाठी महाड चवदार तळ्यावरून प्रारंभ केला. मुंबईत विधानभवनावर धडकणाऱ्या ह्या हजारो मोर्चेकऱ्यांना बुधवारी नवी मुंबई पोलिसांनी पनवेलमध्ये रोखण्यात आले.
या मोर्चात राज्यभरातील धनगर समाजाचे बांधव मोठ्या संख्येने सहभागीझाले होते. मोर्चेकऱ्यांना रोखण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा मुंबई-गोवा महामार्गासह सायन-पनवेल महामार्गावर बंदोबस्त लावण्यात आला होता. चवदार तळ्याला मानवंदना देऊन हजारो मोर्चेकरी सांगली. सातारा. कोल्हापूर. सोलापूर. रायगड जिल्ह्यातून मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ह्या मोर्चा पनवेल मध्ये धडकताच मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतल्यामुळे कळंबोली सर्कल या ठिकाणी काही वेळ ठिय्या मांडला. या वेळी सायन-पनवेल महामार्गावर सुमारे ३० मिनिटे वाहतूककोंडी झाली होती.
हा मोर्चा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी शासनाविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत ‘आरक्षण आमच्या हक्काचे. नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. विशेष हणजे पिवळे झेंडे, मेंढरासह आंदोलनकर्ते विधिमंडळावर धडकणार होते. मात्र. पोलिसांनी कार्यकर्त्यांनाच ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेतल्याची माहिती परिमंडळ उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.