मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीचा (Pune Chinchwad Bypoll Election Result) निकाल गुरुवारी (दि.2) जाहीर झाला. यामध्ये कसब्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला. तर चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Late MLA Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा विजय झाला. चिंचवडमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी बंडखोरी केल्यामुळे भाजपचा (BJP) विजय झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. राहुल कलाटे यांच्यामुळे राष्ट्रवादीचे नाना काटे (NCP Nana Kate) यांचा पराभव झाला. तर अजित पवार (Ajit Pawar) यांनी राहुल कलाटेंनी उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल कलाटे यांना उभे करणे ही राष्ट्रवादीची स्ट्रॅटजी होती असे सांगत अजित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. पुण्यातील पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) माध्यमांशी बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
LIVE | Interacting with media in #VidhanBhavan#Maharashtra #budgetSession2023 #MahaBudget2023 https://t.co/AZeRVnq0ac
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 2, 2023
विरोधकांकडून भ्रम पसरवला जात आहे
चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप विजयी झाल्या असल्या तरी राहुल कलाटे हे गेम चेंजर ठरल्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचा 36 हजार मतांनी विजय झाला. चिंचवडच्या जनतेने लक्ष्मण जगताप यांना या विजयातून श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल कलाटे उभे राहिल्यामुळे भाजपचा विजय झाला, असा भ्रम विरोधकांकडून पसरवला जात आहे. मात्र हे सत्य नाही. राहुल कलाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसेचेच असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
म्हणून कलाटेंना उभं केलं
2019 ला पहिल्यांदा हा प्रयोग करण्यात आला. राहुल कलाटेंना सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन स्वतंत्र उमेदवार म्हणून उभं केलं. पण ते 38 हजारांच्या फरकाने हरले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांना उभं केलं तर जी शिवसेनेची (Shivsena) हिंदुत्ववादी मतं आहेत ती सरळ भाजपकडे जातील, म्हणून त्यांना अपक्ष उभं केलं होतं, असे फडणवीस यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यामागेही हेच डिझाईन होतं
यावेळीही राहुल कलाटे उभे राहिले, त्यामागेही हेच डिझाईन होतं.
ते जर उभे राहिले नाहीत तर हिंदुत्ववादी (Hindutva) मतं शिवसेनेकडे जातात ती सगळी मतं भाजपकडे जातील,
म्हणून त्यांना उभं करण्यात आलं आणि त्यांनी मतं घेतली. ती सगळी मतं महाविकास आघाडीला गेली नसती.
ते उभे राहिले नसते तर 60 ते 65 टक्के मतं भाजपला मिळाली असती. ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्ट्रॅटजी होती,
त्यातूनच त्यांनी कलाटे यांना उभे केल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Web Title :- Devendra Fadnavis | why ncp got chichwad seat in byelection 2023
हे देखील वाचा :
Pune Crime News | लॉजमधील वेश्याव्यवसायाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 4 मुलींची सुटका