नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – आरबीआयने (RBI) शुक्रवारी अचानक दोन हजार रुपयांची नोट (2000 Rupees Note) वितरणातून मागे घेण्याचा निर्णय जाहिर केला. ज्यांच्याकडे या नोटा आहेत त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत नोटा बदलून घेण्याची वेळ दिली आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) या निर्णयावरुन राज ठाकरे (Raj Thackeray), अजित पवार (Ajit Pawar), संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली होती. नोटबंदीवर (Demonetisation) स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल अशा कुणालाही चिंता करण्याची गरज नाही, मात्र ज्यांनी काळा पैसा जमा केला आहे त्यांना त्रास होईल, असे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
दोन हजाराची नोट ही वितरणातून बाहेर काढण्याचा निर्णय झाला आहे. ही नोट काही बेकायदेशीर ठरवलेली नाही. ऑक्टोबरपर्यंत वितरणातून ही नोट बाहेर काढायची आहे. ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला या नोटा बदलता येतील. ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा असतील, ज्यांच्याकडे पांढरा पैसा (White Money) असेल अशा कुणालाही चिंता करण्याची गरज नाही. कुणी काळा पैसा (Black Money) जर जमा करुन ठेवला असेल तर त्याला बदलताना त्रास नक्कीच होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1659829684316565505?s=20
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नोटा बदलताना सांगावं लागणार आहे की इतक्या नोटा आल्या कुठून?
दोन हजारांच्या नोटा किंवा अशा नोटा बदलल्यानंतर त्याचा सगळ्यात मोठा फायदा,
जो मगील वेळीही नोटबंदीनंतर झाला होता. जे बनावट चलन पुश करण्याचा प्रयत्न आयएसआयकडून (ISI) होतो तो हाणून पाडला जातो. एकीकडे जो फेक करन्शी पुश करण्याचा प्रयत्न आहे तो या निर्णयामुळे त्यावर आळा बसेल.
ज्यांनी नोटा जमा करुन ठेवल्या असतील त्यांना आता तपशील द्यावा लागणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
Web Title : Devendra Fadnavis | deputy cm devendra fadnavis statement on two thousand note and he gave answer to critics
- Nana Patole | ‘कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार येईल’, नाना पटोलेंचा दावा
- Mumbai Police Recruitment | पोलीस भरतीत महाघोटाळा? उमेदवाराकडून 10 ते 15 लाख घेतल्याचा काँग्रेस आमदाराचा आरोप
- Pune Crime News | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 26 लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थांचा (मॅफेड्रॉन (एमडी), चरस, गांजा) साठा डेक्कन, कोंढवा आणि पुणे स्टेशन परिसरातून जप्त
- ACB Trap News | 20 हजाराच्या लाच प्रकरणी कोपरगावच्या तहसीलदारासह खाजगी व्यक्ती अॅन्टी करप्शनच्या जाळयात