जालना : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सध्या पोलीस भरती सुरु आहे. मुंबई पोलीस भरती (Mumbai Police Recruitment) लेखी परीक्षा (Written Exam) 7 मे रोजी मुंबईतील विविध केंद्रावर पार पडली. मात्र या पोलीस भरतीमध्ये (Mumbai Police Recruitment) महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल (MLA Kailas Gorantyal) यांनी केला आहे. पोलीस भरती होण्यासाठी एका-एका उमेदवाराकडून 10 ते 15 लाख रुपये घेतले जात असल्याचे गोरंट्याल यांनी म्हटले आहे. तसेच पोलीस भरतीत मोठं रॅकेट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलीस भरतीची फेर परीक्षा घ्या अन्यथा उपोषणाला (Hunger Strike) बसू, असा इशारा गोरंट्याल यांनी दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नुकताच पोलीस भरतीचा निकाल लागला आहे. परंतु मुंबईत झालेल्या परीक्षेत (Mumbai Police Recruitment) मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी गोरंट्याल यांची भेट घेतली. यावेळी पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा (Police Recruitment Scam) झाला असून एका उमदेवाराकडून दहा ते बारा लाख रुपये घेतले असून यामध्ये मोठं रॅकेट काम करत असल्याचा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. पोलीस भरतीची परीक्षा पुन्हा घ्यावी अन्याथा आपण उपोषणाला बसू असा इशारा त्यांनी दिला आहे.
लेखी परीक्षेत हायटेक कॉपी
मुंबईतील पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये हायटेक कॉपी (Hi-tech Copy) करुन अनेक विद्यार्थी परीक्षेला
बसले असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेने केली आहे.
या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. पोलिसांनी समन्वय समितीकडे असलेले पुरावे तपासणीसाठी
मागवले आहेत. परीक्षेच्या दिवशी कॉपी करताना पकडण्यात उमेदवारांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात चार गुन्हे
(FIR) दाखल केले आहेत. उमेदवारांनी कॉपी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास
आले होते.
Web Title : Mumbai Police Recruitment | scam in police recruitment allegation by jalna congress mla kailas gorantyal
- Pune Crime News | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 26 लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थांचा (मॅफेड्रॉन (एमडी), चरस, गांजा) साठा डेक्कन, कोंढवा आणि पुणे स्टेशन परिसरातून जप्त
- ACB Trap News | 20 हजाराच्या लाच प्रकरणी कोपरगावच्या तहसीलदारासह खाजगी व्यक्ती अॅन्टी करप्शनच्या जाळयात
- MLA Aaditya Thackeray | ‘…तर मी आज वरळी विधानसभेचा राजीनामा देतो’, आदित्य ठाकरेंचे सुधीर मुनगंटीवारांना आव्हान
- Online Free Ration Card | सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशन कार्डसाठी एजंटला पैसे द्यावे लागणार नाहीत; घरबसल्या मोफत मिळवा रेशन कार्ड, जणून घ्या प्रोसेस
- Pune LokSabha Bypoll Election | पुणे लोकसभेची पोटनिवडणूक ‘या’ तारखेच्या आत होणे अपेक्षित, जाणून घ्या सविस्तर