लातूर : बहुजननामा ऑनलाइन – भीमा कोरेगाव येथील शौर्यस्तंभाप्रमाणे लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे भव्य असे शौर्याची गाथा असणारे शौर्यस्तंभ उभारण्यात यावे. यामुळे आंबेडकरी जनतेला १ जानेवारी रोजी शौर्यदिनी अभिवादन करण्याची सोय होणार असल्याची मागणी लोकप्रहार संघटनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे महापौरांकडे करण्यात आली आहे.
आंबेडकर पार्कवर शौर्यस्तंभ उभारण्यासाठी मनपाने सर्वसाधारण सभेत विषय ठेवून मंजूर करून तात्काळ काम सुरु करावे. त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कचे सुशोभीकरणाचे काम रखडलेले आहे. ते तात्काळ सुरू करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पाठीमागे तथागत गौतम बुध्दांची मूर्ती बसविण्यात यावी आणि पार्कची जागा व्यावसायिक कामासाठी देऊ नये, आदी मागण्यांचे निवेदन महापौर व मनपा आयुक्तांना देण्यात आले.
यावेळी लोकप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय सूर्यवंशी, रोहित सोनवणे, रवि मस्के, सचिन इचके, अरुण रणदिवे, लाला सोनवणे, काशिनाथ सूर्यवंशी, हिराचंद धायगुडे, महादू शिंदे, प्रशांत कांबळे, युवराज गुंजोटे, निखिल कोलते, सूरज गायकवाड, प्रणय पोटभरे, अविनाश कदम, रवि सोनवणे, प्रशांत सूर्यवंशी, बाळू गायकवाड, नागेश सुरवसे, अभिमन्यू लामतुरे, बालाजी जाधव आदी उपस्थित होते.