नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमधील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जेथे CRPF च्या अधिकाऱ्यांनी महिला कॉन्स्टेबलला घरी आणले आणि तीन दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर CRPF ने लैंगिक छळ आणि बलात्काराच्या आरोपाखाली DIG आणि इंस्पेक्टरला निलंबित केले आहे.
प्राथमिक चौकशीत DIG चीफ स्पोर्ट्स ऑफिसर (CSO) खजान सिंह आणि टीमचे कोच इंस्पेक्टर सुरजित सिंह दोषी आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तीस वर्षांच्या CRPF मध्ये कॉन्स्टेबल पदावर तैनात असलेल्या महिलेने DIG खजान सिंह आणि इंस्पेक्टर सुरजित सिंह यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. असे सांगितले जात आहे की महिला कॉन्स्टेबलने Paramilitary बलासाठी खेळताना बरीच पदके जिंकली.
महिला कॉन्स्टेबलने DIG चीफ स्पोर्ट्स ऑफिसर (CSO) खजान सिंह आणि टीमचे कोच इंस्पेक्टर सुरजित सिंहवर लैंगिक छळ, बलात्कार आणि धमकी देण्याबद्धल आरोप लावला आहे. महिला कॉन्स्टेबलचे म्हणणे आहे की ३१ ऑक्टोबर २०१४ आणि २ नोव्हेंबर २०१४ ला DIG खजान सिंह आणि इंस्पेक्टर सुरजित सिंह यांनी त्यांच्यावर बलात्कार केला. त्यानंतर १ नोव्हेंबर २०१५ ला सुरजित सिंह यांनी त्यांच्यावर बलात्कार केला.
सांगितले जात आहे की आरोपी खजान सिंह आशियाई खेळात जलतरणपट्टू होते. १९८६ मध्ये सोल येथे झालेल्या आशियाई गेम्समध्ये जलतरणपट्टूमध्ये चॅम्पियन होते. हेच नाही तर त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. १९९६ बॅचमधील IPS चारू सिंह या घटनेची चौकशी करत आहेत. यावेळी IPS चारू सिंह श्रीनगरमध्ये आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सुरु आहे.