नवी दिल्ली : वृत्तसंस्था- आम आदमी पार्टीने गुरुवारी काम की चाय चे उद्घाटन केले. अरविंद केजरीवाल सरकारच्या कामाने प्रभावित झालेल्या एमबीए चहावाल्याने आम आदमी पार्टी मुख्यालयात गुरुवारी आपला चहाचा स्टॉल लावला. यामध्ये आम आदमी पार्टी सरकारने केलेल्या कामाला चहाचे नाव दिले आहे. मुळ अहमदाबाद येथील असलेले प्रफुल्ल बिल्लोर एमबीए चायवाला या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी संपर्क साधून काम की चाय स्टॉलच्या माध्यमातून आम आदमी पार्टी सरकारच्या कार्याचा प्रचार करण्याची इच्छा व्यक्त केली. पार्टीचे दिल्ली निवडणूक प्रभारी व राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी एमबीए चायवाला स्टॉलचे उद्घाटन केले.
पार्टी मुख्यालयात लाँच करण्यात आलेल्या एमबीए चायवाला स्टॉलमध्ये एक बॅनर लागला आहे. या बॅनरवर अरविंद केजरीवाल सरकारद्वारे पाच वर्षात आम आदमीसाठी करण्यात आलेल्या प्रमुख कामांना चार प्रकारच्या चहाच्या रूपात समोर ठेवण्यात आले आहे. एमबीए चायवाला स्टॉलचे मालक प्रफुल्ल बिल्लोर यांनी सांगितले की, ते चहा बनवण्याच्या व्यवसायात सुमारे चार वर्षांपासून आहेत.ते अहमदाबादमध्ये राहतात आणि त्यांनी तेथेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत त्यांनी ऐकले. त्यांनी सोशल मीडियावर अरविंद केजरीवाल यांना सतत फॉलो केले. अरविंद केजरीवाल सरकारने आम आदमीसाठी केलेल्या कामाची त्यांनी सखोल माहिती घेतली. त्यांना केजरीवाल यांची भेट घ्यायची होती, यासाठी त्यांनी विविध मार्गाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीच्या काही वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला आणि चहा स्टॉल लावण्याची इच्छा व्यक्त केली. शेवटी त्यांना यश आले आणि त्यांनी स्टॉल लावला.
प्रफुल्ल बिल्लोर यांचे म्हणणे आहे की, अरविंद केजरीवाल सरकारने लोकांसाठी खुप कामे केली आहेत. ज्याच्यामुळे ते प्रभावित झाले. त्यांनी सरकारच्या कामांना चार प्रकारच्या चहाचे नाव दिले आहे.
शिक्षणवाला चहा :
यामध्ये त्यांनी सरकारी शाळांमध्ये केलेल्या सुधारणांना सहभागी केले आहे. मागील पाच वर्षात सर्व सरकारी शाळा चांगल्या झाल्या आहेत. शाळांमध्ये जागतिक दर्जाचे शिक्षक आहेत. स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आणि शाळांमधील मेगा पीटीएमबाबत सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
आरोग्यवाला चहा :
अरविंद केजरीवाल सरकारने सर्व सरकारी रूग्णालयांमध्ये सर्व आरोग्य सेवा चांगल्या केल्या आहेत. रूग्णालयांमध्ये मोफत तपासण्या, सर्जरी आणि औषणे मिळत आहेत. ठिकठिकाणी मोहल्ला क्लिनिक आणि पॉली क्लिनिक उघडण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्य सामान्य माणसांना चांगली सवलत मिळत आहे.
स्पेशल चहा :
हा चहा खुप खास आहे, जो सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजांशी संबंधीत आहे. ज्याचा सामना प्रत्येक व्यक्तीला दररोज करावा लागतो. यात दिल्लीच्या नागरिकांना 200 यूनिटपर्यंत मोफत व स्वस्त वीज, 20 हजार लीटर प्रतिमाह मोफत आणि स्वस्त पाणी आणि महिलांसाठी मोफत बससेवा आहे. या सेवांमुळे आम आदमीला आर्थिक रूपाने मदत मिळाली आहे.
विकासवाला चहा :
त्यांनी या चहाच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल सरकारने केलेली विकास कामे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये डोअर स्टेप डिलिव्हरी, सीसीटीव्ही कॅमेरे, मोफत वायफाय सारखी कामे आहेत.
प्रफुल्ल बिल्लोर यांचे म्हणणे आहे की, ते कोणत्याही पक्षाला मदत करत नाहीत, परंतु जे चांगले काम आहे त्याची प्रशंसा केली पाहिजे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत काम केले आहे. त्यांचे काम जमिनीवर दिसत आहे. कोणालाही सांगण्याची गरज नाही. जमिनीवर काम दिसत असल्यानेच त्यांनी अहमदाबादवरून येऊन येथे स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांचे 30 ते 40 स्वयंसेवक येणार आहेत, जे सर्व विधानसभा मतदार संघात एमबीए चायवाला स्टॉल लावतील. ते म्हणाले, जर कांग्रेस, भाजपा अथवा दुसरा कोणताही पक्ष बोलवत असेल तर आम्ही जाणार नाही. ते तेव्हाच त्यांच्यासाठी स्टॉल लावतील, जेव्हा ते अरविंद केजरीवाल यांच्यासारखे काम करतील.
प्रफुल्ल यांचे म्हणणे आहे की, ते लोकांना फुकट चहा तयार करून पाजत आहेत. याशिवाय अनेक सामाजिक कामे करत आहेत. केरळामध्ये आलेल्या पुरानंतर त्यांनी तेथे मोठा निधी दिला होता. रक्तदान शिबीर भरवले होते. गरीब मुलांना शिकण्यासाठी पैसे देतात. त्यांनी एमबीए मधूनच सोडून चहाचा स्टॉल लावण्यास सुरूवात केली होती. आता ते देशात अनेक ठिकाणी जाऊन चहा बनवून अनेकांना पाजतात.
Visit : bahujannama.com