मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महिला टीम इंडियाची फलंदाज स्मृती मंधानाला नुकतेच आयसीसीकडून वुमन क्रिकेटर ऑफ द इयर घोषित करण्यात आले आहे. याशिवाय बीसीसीआयकडून पुरूष आणि महिला क्रिकेटरला देण्यात येणार्या वार्षिक केंद्रीय मानधनातील फरक हा चर्चेचा विषय होता. पुरूषांच्या तुलनेत महिला क्रिकेटर्सना मिळणार्या तुटपुंज्या रक्कमेवर मंधानाने आपल्या प्रतिभेनुसार केलेल्या वक्तव्याने जगभरातील आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.
मंधानाला महिला क्रिकेटमधील आव्हानांची चांगली जाणीव आहे. ती पुरुष आणि महिला क्रिकेटर्सच्या सॅलरीतील फरकामुळे बिलकुल नाराज नाही. तिने समान मानधाबाबत मुंबईतील एका कार्यक्रमात आपले विचार मांडले. मंधानाने म्हटले, आम्ही समजून घेतले पाहिजे की आपल्याला जे उत्पन्न मिळते ते पुरूष क्रिकेटमधून मिळते. ज्या दिवशी महिला क्रिकेटमधून उत्पन्न मिळण्यास सुरूवात होईल, तेव्हा सर्वात आधी मी म्हणेण की आम्हाला समान सॅलरी दिली पाहिजे, परंतु सध्या आम्ही असे करू शकत नाही. 23 वर्षांच्या या क्रिकेटरने पुरुष क्रिकेटचे उत्पन्न आणि संरचना याबाबत भाष्य केले.
पुरुष क्रिकेटर्सना बीसीसीआयकडून वार्षिक केंद्रीय मानधनाअंतर्गत जिथे सर्वात जास्त 7 कोटी रूपये मिळत आहेत, तेथे महिला क्रिकेटर्सना सर्वाधिक 50 लाख रूपये सॅलरी दिली जात आहे. मंधानाने म्हटले, मला वाटत नाही की आमची कोणतीही सहकारी या फरकाचा विचार करत असेल, कारण आमचे लक्ष्य देशासाठी स्पर्धा जिंकण्याकडे आहे, ज्यामुळे लोक मॅच बघण्यासाठी येतील आणि उत्पन्न वाढेल, आम्ही हे ध्येय ठेवून पुढे जात आहोत. आणि हे झाले तर बाकी सर्व गोष्टी आपोआप होतील. मंधानाने म्हटले, यासाठी आम्हाला चांगला परफॉर्म करावा लागेल. आमच्यासाठी हे बोलणे योग्य ठरणार नाही की, आम्हाला सॅलरीची गरज आहे. यासाठी मला सॅलरीतील फरकावर काही बोलायचे नाही. वुमन टीम इंडियाला आता ऑस्ट्रेलिया सीरीज आणि नंत वर्ल्ड टी20 टूर्नामेन्ट मध्ये खेळायचे आहे. मंधानाला वाटते की ऑस्ट्रेलियातील सीरीज टीमसाठी वर्ल्ड कपच्या तयारीसाठी योग्य ठरेल.
Visit : bahujannama.com