बहुजननामा ऑनलाइन टीम – महाविकास आघाडीने दिलेली विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी अद्यापही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor-bhagatsingh-
पुण्यात एका खासगी कार्यक्रमासाठी मंत्री मलिक आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी मी स्वतः, अनिल परब व अमित देशमूख यांनी राज्यपालांना दिली आहे. त्यानंतर त्यांनी ती नावे जाहीर करायला हवी होती. पण अद्याप केलेली नाहीत. राज्यात 12 आमदार काम करतील, त्यामुळे लवकर नावे जाहीर करा अशी आमची त्यांंना विनंती आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात गेलेले अनेकजणांना परत यायचे आहे हे ऊपमुख्यमंत्र्यांनी सांगितले, ते खरेच आहे. भाजपाने आता त्यांचे लोक सांभाळावेत, अनेकजण संपर्कात आहेत, येत्या चार महिन्यात ही वापसी सुरु होईल, असेही ते म्हणाले.