ओतूर : बहुजननामा ऑनलाइन – दुपारी घरात खेळत असलेल्या अवघ्या 9 वर्षांच्या मुलीवर जन्मदात्या पित्यानच बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पिंपरी पेंढार येथील नात्याला काळीमा फासणारा हा प्रकार आहे. शनिवारी घडलेल्या या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.
ओतूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिचं कुटुंब नगर-कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथे राहतं.
नेमकं काय घडलं ?
पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पीडित मुलगी घरात एकटीच खेळत होती. आजूबाजूला कुणी नाही हे पाहून मुलीच्या वडिलांनीच तिच्यासोबत दुष्कर्म केलं. ही घटना समोर येताच पीडित मुलीच्या आईनं ओतूर पोलीस ठाण्यात धावत सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. यानतंर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्या घेतलं. ओतूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.