बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अॅक्ट्रेस दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सोशलवर कायमच अॅक्टीव्ह असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओअनेकदा चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत असते. कधी कधी तिचा बोल्ड किंवा ग्लॅमरस अवतारही पाहायला मिळतो. तिनं अनेकदा बोल्ड बिकिनी लुकमधील फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यावेळी दीपिकानं असा एका फोटो शेअर केला आहे ज्यामुळं ती गुड न्यूज देणार आहे अशी चर्चा होताना दिसत आहे. अनेकांनी यावरून सवाल केले आहेत.
दीपिकानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती पोटाकडे बघून प्रेमानं हसताना दिसत आहे. फोटो शेअर करतानाही तिनं फक्त फेब्रुवारी एवढंच लिहिलं आहे. सध्या दीपिकाचा हा फोटो सोशलवर जोरदार चर्चेत आहे. दीपिका आता खुशखबर देणार आहे का असा प्रश्न अनेकांनी केला आहे.
दीपिका पादुकोण की Photo ने मचाया हंगामा, क्या यह Good News का इशारा है…? pic.twitter.com/zKeEd01qwS
— TimePass (@TimePassTalks) February 1, 2021
दीपिकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा फोटो शेअरही केला आहे.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा छपाक सिनेमा रिलीज झाला आहे. लवकरच ती पती रणवीर सिंगसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांचा रोल ती साकारत आहे. तिचा पती अभिनेता रणवीर सिंगनं कपिल देवची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील असणार आहेत. शाहरुखच्या पठाण सिनेमातही ती काम करताना दिसणार आहे. इतकंच नाही तर हृतिक रोशन सोबत ती फायटर सिनेमातही झळकणार आहे. प्रभासच्याही एका सिनेमात ती झळकणार आहे.