बहुजननामा ऑनलाइन टीम : पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर स्वत: ला पेटवून घेणाऱ्या उन्नाव बलात्कार पीडितेचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. आरोपींविरोधात दिलेल्या तक्रारीवर पोलिसांची कोणतीही कारवाई न झाल्याने पीडितेने 16 डिसेंबर रोजी पोलिस कार्यालयाबाहेर स्वत: ला पेटवून घेतले. ज्यामुळे पीडितेचे 80 टक्के पेक्षा जास्त शरीर जळाले होते.
पीडित मुलीवर १ डिसेंबरपासून कानपूरच्या लाला लाजपत राय रुग्णालयात उपचार सुरू होते आणि शनिवारी रात्री तिचा मृत्यू झाला.पोलिसांवर आरोप करत पीडितेने सांगितले होते की, पोलिस तिच्या तक्रारीवरून आरोपी अवधेश सिंगविरोधात कोणतीही कारवाई करीत नाही.
अवधेश सिंगविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु नंतर त्याला कोर्टाकडून अटकपूर्व जामीन ही मिळाला होता.दुसरीकडे, उन्नावचे पोलिस अधीक्षक विक्रांत वीर यांचे म्हणणे आहे की, महिलेचे अवधेशशी अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 2 ऑक्टोबर रोजी महिलेने अवधेशवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता.
Visit : bahujannama.com