बहुजननामा ऑनलाईन टीम – नागपूर मध्ये रात्रपाळीला असलेल्या कामगाराचा मृत्यू. शुक्रवारी पहाटे ५. ०० वाजता तारसा येथील एनटीपीसी प्रकल्पात रात्रपाळीला असलेल्या अजय केशव मोटघरे आजनगाव याचा मशीन मध्ये दबून जागीच मृत्यू झाला. रात्री १० वाजता काम करत असताना एम जी आर विभागात काम करीत असताना साईड आर्म चार्ज मागे आली आणि अजय जिथे उभा होता मागे कोळशाचा मोठा डब्बा असल्यामुळे अजय मधोमध सापडल्यामुळे तो जागीच मृत्यू पावला.
घटनास्थळचा अलार्म काही दिवसांपासून बंद असल्यामुळे अलार्म वाजला नाही. म्हणून सूचना न मिळाल्याने अजयचा जागीच मृत्यू झाला अशी चर्चा आहे. अलार्म न वाजण्यामागे कारण म्हणजे गेल्या तीन दिवसापासून या मशीनमध्ये बिघाड होता. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अजयचा मृत्यू झाला आहे असा कामगारांचा दावा आहे.
अजय हा धामणगावचा रहिवासी आहे. तो एमजीआर विभागात कार्यरत होता. या घटनेनंतर व्यवस्थपकांच्या बंगल्यावर शेकडो कामगारांनी घेराव घेतला आणि दगडफेकही केली. या घटनेनंतर अजयच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये आणि एकाला नोकरी अशी मागणी केली. या घेरावा दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात दोनजण जखमी झाले आहेत. यात जखमी झालेल्यांपैकी मंगेश ठाकरे हा गंभीर जखमी झाला आहे.