मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – तिहेरी तलाक बद्दल विधेयक गुरुवारी लोकसभेत सादर करण्यात आले. एकीकडे मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक प्रथेवर बंदी घालण्याबाबतचे विधेयक काल, गुरुवारी लोकसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकवर बंदी घालण्याचा निकाल दिल्यानंतरही तलाक दिल्याचे ३४५ प्रकार घडले आहेत.असाच एक प्रकार सुरतमध्ये घडला.
एका व्यक्तीने सायकल रिक्षा खरेदी करण्यासाठी पत्नीच्या कुटुंबियाकडे ४० हजार रुपये मागितले आणि पैसे न मिळाल्यामुळे त्याने आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिला. सूरतमधील २३ वर्षीय महिलेने आरोप केला आहे की, माझे आई-वडील माझ्या पतीला सायकल खरेदी करण्यासाठी ४० हजार देऊ शकले नाही म्हणून पतीने मला तिहेरी तलाक दिला. त्यामुळे पतीला शिक्षा झालीच पाहिजे.
मला न्याय मिळावा. तर सूरतमधील स्पेशल ब्रँचचे साहाय्यक पोलिस आयुक्तांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सुरू आहे. तिहेरी तलाक देणार्या इसमास तीन वर्षांच्या तुरुंगवासाची करण्यात आलेली तरतूद देखील आवश्यक असल्याची ठोस भूमिका केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी मांडली. उत्तर प्रदेशात देखील एक तिहेरी तलाकचा प्रकार समोर आला आहे की, पत्नी तंबाखूच्या मिश्रीपासून दात घासते म्हणून तिला तलाक दिला. असे अनेक उदाहरण आहेत. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन लैंगिक समानता कशी येईल, हे पाहिले पाहिजे. याच उद्देशाने मोदी सरकारने हे विधेयक आणले आहे.