नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर सामूहिक बलात्कार प्रकरणी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. एका आईने आपल्याच मुलीला फसवण्यासाठी स्वतःवरच सामूहिक बलात्कार घडवला. यामध्ये तिच्या नवऱ्याचाही हात होता. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केल्यास पोलिसही हैराण आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दांपत्यांना अटक केले आहे.
दोन दिवसाआधीच बुलंदशहर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी काही चोर घुसले होते. या चोरांनी घारातील साहित्य चोरताना घरातील महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि हजारोंचा ऐवज घेऊन फरार झाले. अशी माहिती पोलिसांना पीडित महिलेनी दिली होती. परंतु जेव्हा पोलिसांनी पीडित महिला आणि तिच्या नवऱ्यावर कडक चौकशी केली असता हा सगळा प्रकार खोटा असल्याचा समोर आले.
या दाम्पत्याची मुलगी पळून जाऊन आंतरजातीय विवाह केला होता. म्हणून मुलीला फसवण्यासाठी आणि तिला पोलीस ठाण्यात पाठवण्यासाठी त्यांनी या खोट्या चोरीची आणि सामूहिक बलात्काराची घटना रचली होती. पोलिसांनी महिलेचे वैद्यकीय चाचणी केली असता त्यातून सिद्ध झाले की, महिलेवर कोणत्याच प्रकारचा सामूहिक बलात्कार झालेला नाही. बनावट गुन्हा दाखल केल्याचा आरोप या पती पत्नीवर करून पोलिसांनी यांना अटक केली.
- पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे
- घरातील सर्व प्रकारच्या स्वच्छेतेसाठी बनवा नैसर्गिक पद्धतीने घरगुती ‘क्लिनर’
- चेहऱ्यांची ‘सुंदर’ता आणि ‘चमक’ वाढविण्यासाठी हळदीचे पाणी उपयुक्त, जाणून घ्या याचा वापर
- केसातील ‘कोंड्या’पासून मुक्तीसाठी करा ‘हे’ १० घरगुती आयुर्वेदिक उपाय
- ‘अॅल्युमिनियम फॉईल’मध्ये जेवण पॅक करता, तर होऊ शकतात ‘हे’ आजार
- सावधान ! पुण्यात मुलांमध्ये विषाणूजन्य ताप, अतिसार, डेंग्यू आणि हँड-फूट-माऊथ आजाराची ‘साथ’
- त्वचेचा कर्करोग टाळण्यासाठी करा ‘हे’ 4 घरगुती उपाय, जाणून घ्या