नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाचे तुम्ही जर ग्राहक असाल तर तुमच्यासाठी जबरदस्त रिचार्ज प्लान आहेत. या प्लानमध्ये दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळत आहे. या प्लानची वैधता 28 दिवस ते 84 दिवसांची असून यात 2 जीबी डेली डेटा मिळतो.
जिओचा 2GB डेली डेटा प्लान
रिलायन्स जिओ कमी किंमतीत 2GB डेली डेटा ऑफर करत आहे. नॉन जिओ नेटवर्क्सवर कॉलिंग करण्याची सुविधा आहे. 28 दिवस आणि 84 दिवसांची वैधता असलेल्या या प्लानची किंमत 249 रुपये आणि 599 रुपये आहे. यामध्ये रोज 2GB डेटा ऑफर केले जात आहे. तसेच यात रोज 100 फ्री एसएमएस सुद्धा मिळतात. जिओ ते जिओवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग शिवाय अन्य नेटवर्क्सवर कॉलिंग करण्यासाठी अनुक्रमे 1 हजार ते 3 हजार मिनीट मिळतात. यामध्ये जिओ प्लॅटफॉर्म आणि अॅप्सच्या सर्व्हिस ऑफर मिळतात.
व्होडाफोन-आयडियाचा 2GB डेली डेटा प्लान
व्होडाफोन-आयडिया कंपनी ग्राहकांना डबल डेटा बेनिफिट्स देत आहे. कंपनीच्या 299 रुपयांच्या आणि 699 रुपयांच्या प्लानची वैधता 28 आणि 84 दिवसांची आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा शिवाय 2GB अतिरिक्त डेटा लिमिटेड टाईम्स ऑफर अंतर्गत मिळतो. म्हणजेच या प्लानमध्ये रोज एकूण 4GB डेटा दिला जातो. सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग सोबत यात रोज शंभर एसएमएस फ्री दिले जातात. हे प्लान व्होडाफोन-आयडिया व्हिडीओ प्लॅटफॉर्म्स आणि ZEE 5 चे सब्सक्रिप्शन मिळते.
एअरटेलचा 2GB डेली डेटा प्लान
रोज 2GB डेटाचे दोन प्लान एअरलेट कडून ऑफर करण्यात आले आहे. पहिला 298 रुपयाचा आहे. याची वैधता 28 दिवसांची आहे. तर दुसरा प्लान 698 रुपयाचा आहे. या प्लानची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लानमध्ये 2GB डेटासह सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग ऑफर आहे. एअरटेल थँक्स अॅप्ससोबत युजर्सला 2GB फ्री क्लाऊड स्टोरेज देखील मिळतो. इतर बेनिफिट्समध्ये एअरटेल Xstream Premium आणि Wynk Music सब्सक्रिप्शन, Hellotunes आणि FASTag खरेदीवर 150 रुपयाचा कॅशबॅक मिळतो.