पुणे : बहुजननामा ऑनलाईन – नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील वरिष्ठ महिला डॉक्टरांच्या रँगिगला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने केलेल्या आत्महत्या प्रकरणी आत्महत्येची पार्श्वभूमी व महत्त्वाचे घटक यांचे मूल्यमापन करण्यासाठी वैद्यकीय व्यवसायामध्ये सामाजिक व श्रेणीय पैलू निर्माण करण्याचा एकत्रित प्रयत्न म्हणून, इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) सत्यशोधक मोहीम समितीची स्थापना करण्यत आली आहे.
डॉक्टरांना ज्या हालाखीच्या स्थिती काम करावे लागते ती स्थिती व विशेषत: सरकारी रुग्णालयांतील राहण्याची व्यवस्था, त्यांच्याकडून नेहमीच लादला जाणारा कामाचा असाधारण ताण आणि क्लिनिकल कौशल्यांच्या अभावाबद्दल नेहमी केला जाणारा उपहास, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.आयएमए सत्यशोधक समिती हा क्लिष्ट विषय बारकाईने अभ्यासणार आहे. साधारणपणे एका आठवड्यात समितीने आयएमए राष्ट्रीय अध्यक्षांकडे अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. अभ्यासाच्या अहवालाच्या अनुषंगाने, सद्यस्थितीच्या संदर्भात योग्य उपाय राबवले जातील असे आयएमए तर्फे सांगण्यात आले आहे.
कोण असतील सत्यशोधक समितीमधील सदस्य ?
डॉ. अशोक आढाव, आयएमए माजी राष्ट्रीय अध्यक्ष, नागपूर
डॉ. रवी वानखेडेकर, आयएमए माजी राष्ट्रीय अध्यक्ष, धुळे
डॉ. चंद्रकांत म्हस्के, डीन जीएमसी नांदेड
डॉ. होझी कपाडिया, आयएमए महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, मुंबई
डॉ. सुहास पिंगळे, आयएमए महाराष्ट्र राज्य सचिव