लाहोर : बहुजननामा ऑनलाइन टीम – पब्जी गेमचा (PUBG Game) तरुणांवरील प्रभाव अद्यापही कमी झालेला दिसून येत नाही. या गेममुळे पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतात धक्कादायक घटना (Crime News) घडली आहे. एका अल्पवयीन मुलाने पब्जीचा टास्क (PUBG Task) पूर्ण करण्यासाठी चक्क आईसह भाऊ आणि दोन बहिणींवर गोळ्या झाडून (Crime News) त्यांना ठार केले.
लाहोरच्या (Lahore) काहना परिसरात हा प्रकार घडला असून आरोग्य कर्मचारी महिला नाहिद मुबारक (Nahid Mubarak) (वय४५), त्यांचा मुलगा तैमूर (Taimur) (वय२२), तसेच १७ आणि ११ वर्षीय दोन बहिणींचा मृत्यू (Death) झाला आहे.
लाहोर पोलिसांनी (Lahore Police) दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा हा पब्जी (प्लेयर अननोन्स बैटलग्राउंड) या गेमच्या आहारी गेला आहे. दिवसभर तो गेम खेळत होता. त्यामुळे त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता. त्याचे वागणे एखाद्या मनोरुग्णा प्रमाणे झाले होते. नाहिदा मुबारक यांचा तलाक झाला असून दिवसभर मुलगा गेम खेळत असल्याने त्या मुलावर रागवत होत्या. घटनेच्या दिवशीही त्यांनी मुलाला गेम खेळण्यावरून रागवले होते. त्यामुळे मुलाने चिडून जाऊन घरातील कपाटात असलेली पिस्तुल (Pistol) काढून आईसह बहिण-भावांची गोळ्या झाडून (Firing) हत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यानंतर हा प्रकार (Crime News) उघडकीस आला. शेजारच्या लोकांनी याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी मुलगा आणि गटारात पडलेलं पिस्तुल ताब्यात घेतलं. यावेळी, या सर्वांची हत्या (Murder) कशी झाली हे मला माहिती नाही, असा आरोपीने पोलिसांना म्हटले. नाहिदा मुबारक यांनी कुटुंबाच्या संरक्षणासाठी हि पिस्तूल घेतली होती. मात्र, त्याच पिस्तुलमुळे त्यांच्यावर जीव गमावण्याची वेळ आली. दरम्यान, ऑनलाईन गेमिंगमधून (Online Gaming) घडलेल्या गुन्ह्याचं लाहोरमधील हे चौथं प्रकरण असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Title :- Crime News | murder of two sisters including mother by a boy while playing pubg in lahore
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Aditya Thackeray | मास्कमुक्त महाराष्ट्र नाहीच; आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
Pune Weather | पुण्यात थंडीचा कडाका वाढला ! हंगामातील सर्वात निचांकी किमान तापमानाची नोंद