पटणा :वृत्तसंस्था – Crime News | एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीसोबत त्यांच्याच घरात काम करणाऱ्या विश्वासून कुकने विकृत कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार पटणा (Crime News) येथे उघडकीस आला आहे. संबंधित महिला आयपीएस अधिकारी कामावर गेल्या असताना मुलगी खोलीत एकटी असल्याचे पाहून कुकुन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न (attempt to rape) केला. पटणातील (Patana) महिला पोलीस ठाण्याला (Women police station) या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीच्या मुसक्या (Arrest) आवळल्या आहेत.
बिहार राज्यातील (Bihar state) पटणा येथील एका महिला आयपीएस अधिकारी कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. घरातील कुकनं आयपीएस अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच मुलीने विरोध केल्याने कुक घाबरला अन् तो खोलीबाहेर पळून गेला. या प्रकरणी कुक विरोधात गुन्हा (FIR) दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं ?
आरोपी कुक हा महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या घरामध्ये मागील अनेक दिवसांपासून काम करत आहे. घरातल्या सर्वांचा त्याच्यावर विश्वास आहे.
त्यामुळे तो अशा प्रकारचे कृत्य करेल असे कोणालाही वाटले नाही.
कुकवर विश्वास असल्याने महिला अधिकाऱ्याने मंगळवारी (दि.7) आपल्या 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला घरात एकटीला सोडून कमानिमित्त बाहेर गेल्या होत्या.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, पीडित मुलगी आपल्या खोलीमध्ये अभ्यास करत असताना आरोपी कुक तिच्या खोलीत गेला. त्यानंतर त्यानं मुलीचे पाय दाबण्याचा बहाणा करत मुलीसोबत विकृत कृत्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिच्यासोबत घडणारा प्रकार लक्षात आल्यानंतर मुलीने हिम्मत दाखवून आरोपीला विरोध केला. त्यानंतर आरोपी पीडितेच्या खोलीतून निघून गेला.
या संतापजनक घटनेनंतर पीडित मुलीने आपल्या आईला फोन करुन हा सर्व प्रकार सांगितला.
आरोपीला तात्काळ अटक
मुलीने फोनवर घटनेची माहिती दिल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याने या घटनेची माहिती महिला पोलीस ठाण्यात फोन करुन दिली.तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीनं घरं गाठलं आणि आरोपी कुक बच्चा कुमार Bachcha Kumar (वय-50) याला ताब्यात घेतलं.
महिला अधिकारी कामावरुन परत आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title : Crime News | attempt to rape on woman ips officers minor daughter by cook in patana bihar crime.